You are here
Home > महत्वाची बातमी > भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन

नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, काहीच सुधारणा दिसत नव्हती. त्यामुळे, डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. यानंतर शनिवारी त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. देश सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या दुखातून सावरला नाही. त्यातच जेटलींना या जगाचा निरोेप घेतला. जेटलींच्या निधनाने राजकीय वर्तुळासह देशभर शोककळा पसरली आहे.

9 ऑगस्टपासून एम्समध्ये घेत होते उपचार

श्वास घेण्यात अडथळा निर्माण झाल्याने जेटलींना 9 ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेटलींना सॉफ्ट टिश्यू कॅन्सर होता. ते उपचारासाठी 13 जानेवारी रोजी न्यूयॉर्कला सुद्धा गेले होते. फेब्रुवारीतच ते उपचार करून भारतात परतले होते. जेटलींनी अमेरिकेत उपचार केल्यानंतर घरी आल्यानंतर किती खुश आहोत याबद्दल एक ट्वीट केले होते. त्यांनी एप्रिल 2018 पासूनच कामकाज बंद केले होते. 14 मे 2018 रोजी त्यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यांना शुगर देखील होता. सप्टेंबर 2014 मध्ये वजन वाढल्याने जेटलींवर बॅरियाट्रिक सर्जरी सुद्धा करण्यात आली होती.

भाजपच्या विजयी जल्लोषातही होते अनुपस्थित
जेटलींवर 6 महिन्यांपूर्वी सुद्धा एम्स रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी ब्रिटन आणि अमेरिकेत जाण्याचा सल्ला दिला होता. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयानंतर ते भाजप कार्यालयात दिसलेच नव्हते. त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत सुद्धा सहभाग घेतला नव्हता. मे 2019 मध्ये त्यांनी मोदींना सांगितले होते, की ते सरकारमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. यानंतर पीएम नरेंद्र मोदी जेटलींची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी सुद्धा गेले होते.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा