You are here
Home > चंद्रपूर > ब्रेकिंग न्यूज :- कोळसा चोरी प्रकरण उघड झाल्याने कोळसा खाणीतून भरून निघालेले कोळसा ट्रक अजून वाटेतच !

ब्रेकिंग न्यूज :- कोळसा चोरी प्रकरण उघड झाल्याने कोळसा खाणीतून भरून निघालेले कोळसा ट्रक अजून वाटेतच !

कोळसा चोरी प्रकरण ! 

कैलास अग्रवाल यांनी कोळसा खाली करण्यास केली मनाई, भाड्याच्या ट्रक मालकांची पंचाईत ? कैलास अग्रवाल यांची अटकपूर्व जामीन साठी न्यायालयात धाव !

चंद्रपूर प्रतिनिधी :

चंद्रपूर तालुक्यातील नागाडा कोल डेपो चे कोळसा चोरी प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्रात पोहचले असून या प्रकरणाचा छडा लावण्याकरिता पोलिस प्रशासन स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ऊद्दोगाना सबसिडीवर दिला जाणाऱ्या कोळशाचा तपास करीत आहे. मात्र असे असले तरी दिनांक १७ फेब्रुवारीला कोळसा चोरी प्रकरण प्रकाशात आल्यानंतर कैलास अग्रवाल आणि त्यांच्या सहयोगी ट्रान्सपोर्टर यांनी दिनांक १८ फेब्रुवारीपासून वेकोलि कोळसा खाणीतून निघालेल्या कोळसा गाड्या कोळसा टाल वर उतरविण्यास व वे ब्रिज वर काटा करण्यासाठी मनाई केली आहे त्यामुळं ह्या गाड्या अजूनही कोळसा डेपो मधे किंव्हा वे ब्रिज मधे काटा करण्यासाठी पोहचल्या नसल्याचे कळते. या गाड्या मधातच कुठे तरी उभ्या असल्याची माहिती असून ह्या ट्रक गाड्या किरायाच्या असल्याने गाडी मालकांचे यामुळे मोठे नुकसान होत आहे. आगोदरच ज्या २४ कोळशाच्या ट्रक पकडल्या त्यापैकी जवळपास सर्वच ट्रक ह्या किरायाने असल्याचे बोलल्या जात आहे. केवळ ट्रक गाड्यांच्या किरायाकरिता अवैध कोळसा वाहतूक करिता लावलेल्या या ट्रक गाड्या कोळसा माफियांनी कोट्यावधी रुपयांच्या कमाईचे साधन बनविले आहे, मात्र आता त्या गाड्या पोलिसांनी पकडल्या नंतर कधी सुटणार ? आणि सुटणार की नाही ? या संभ्रमात ट्रक मालक चिंताग्रस्त आहे. आता कैलास अग्रवाल व त्यांच्या काही साथीदारांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी कुणालाही अजून पर्यंत अटक न झाल्याने आता या प्रकरणात ज्या ज्या ट्रक मालकांनी आपले ट्रक कोळसा वाहतुकीसाठी लावले आहे ते ट्रक तूर्तास सुटणार नसल्याने लाखों रुपयाचे ट्रक मालकांचे नुकसान होणार आहे. हजारो कोट्यावधी रुपयांच्या या कोळसा कांडात मुख्य आरोपी कैलास अग्रवाल हे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अपील करीत असून स्थानिक न्यायालयात जामीन मिळणे शक्य नसल्याने उच्च न्यायालयातूनच अटकपूर्व जामीन मिळेल असे संकेत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा