You are here
Home > Breaking News > भद्रावती शहरात अवैध दारू विक्रेत्यांकडून पोलिसांची लाखोंची हप्ता वसुली, कैमेऱ्यात झाली कैद !

भद्रावती शहरात अवैध दारू विक्रेत्यांकडून पोलिसांची लाखोंची हप्ता वसुली, कैमेऱ्यात झाली कैद !

प्रत्यक्षदर्शीनी काढले विडिओ, पोलिस कर्मचारी देरकर आणि खनके यांचा समावेश, दारूविक्रेत्यांचा विडिओ आला समोर !

भद्रावती प्रतिनिधी :-

मागील काही महिन्यांपूर्वी शाहबाज सय्यद नावाच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा अवैध दारू विक्रेत्यांकडून हप्ता वसुलीचा प्रकार भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलवर प्रकाशित झाल्यानंतर भद्रावती शहरात पोलिस विभागात खळबळ उडाली होती. त्यानंतर त्या शाहबाज सय्यद यांचेकडून वसुलीचे काम काढून टाकण्यात आले होते. मात्र आता नवीनच पोलिस कर्मचारी असलेले देरकर व खनके हे अवैध दारू विक्रेत्यांकडून जवळपास चार लाख रुपयाची हप्ता वसुली करीत असल्याचा विडिओ हाती लागला असून यामधे एक छोटासा पानठेला टाकून बसलेला व्यक्ती हा भद्रावतीच्या मुख्य टप्प्यावर अवैध पद्धतीने दारू विक्री चालवीत असून तो व त्याचे सोबत असलेले काही अवैध दारू विक्रेते हे महिन्याकाठी चार ते साडेचार लाख रुपये हे पोलिसांना हप्ता वसुलीच्या नावाखाली देत असल्याचा धक्कादायक प्रकार भद्रावती येथे घडत आहे .
काल दिनांक २६ फेब्रुवारीला सायंकाळी अंदाजे सात साडेसात वाजता देरकर व खनके हे दोघे पोलिस कर्मचारी भद्रावती टप्प्यावर अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्ती कडे जातात आणि तो ह्या दोन पोलिसांना पाचशे आणि शंभरच्या नोटा देतात, त्यानंतर त्या नोटा मोजल्या जातात व दोघे आपसात त्याचे वाटप करतात हा प्रकार एका पत्रकारांच्या मोबाईल कैमेरामधे कैद झाला असून अवैध दारू विक्रेत्यांनी छुप्या कैमेऱ्यासमोर महिन्याकाठी चार ते साडेचार लाख रुपये या वसुलीचा हिशोब होत असल्याचे सांगितल्याने अवैध दारूच्या व्यवसायात पोलिस प्रशासनाकडे ऐकून शहर आणि तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांकडून किती लाख जात असतील व ह्या अवैध दारू विक्रेत्यांचा दररोज किती लाखाचा दारू साठा विकल्या जात असतील याचा विचार केल्यास भद्रावती शहरात दररोज दहा ते पंधरा लाख रुपयाची दारू विकल्या जात असल्याची माहिती आहे. आता वरील दोन पोलिस कर्मचारी जर एका अवैध दारू विक्रेत्यांकडून चार ते साडेचार लाख रुपये वसुली करीत आहे तर सर्व दारूविक्रीचा हिशोभ केल्यास ऐकून किती लाख हप्ता वसुली पोलिसांकडून होत असेल याचा अंदाज येतो. आता या संदर्भात भद्रावती पोलिस स्टेशन चे ठाणेदार पवार काय भूमिका घेतात यांवर सर्व अवलंबून आहे.

2 thoughts on “भद्रावती शहरात अवैध दारू विक्रेत्यांकडून पोलिसांची लाखोंची हप्ता वसुली, कैमेऱ्यात झाली कैद !

  1. छान सर्, उमेश कांबळे (भूमि पुत्राची हाक) भद्रावती

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा