
कोळसा चोरीच्या प्रकरणात सहभागी सर्वच दोषीवर होणार गुन्हे दाखल !
कोळसा चोरी प्रकरण:
चंद्रपूर प्रतिनिधी :-
जिल्ह्यात लघु ऊद्दोगाना जाणारा कोळसा मधातील दलाल कोळसा माफिया आपल्या कोळशाच्या टाल वर उतरवून कोट्यावधीचा कोळसा घोटाळा मागील अनेक वर्षांपासून होत असतांना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नागाडा येथील कोळसा टालवर तब्बल २६ कोळशाचे अनधिकृतपणे कोळसा वाहतूक करणारे ट्रक ज्यामध्ये २ ट्रक घूग्गूस पोलिस स्टेशन मधे जब्त आहे ते सर्व पकडल्याने जिल्ह्यातील कोळसा माफियांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास अग्रवाल यांच्यासह त्यांच्या सहयोगी ट्रान्सपोर्टर वर घूग्गूस पोलिस स्टेशन मधे कलम 464,465, 468,471,420, 34 ipc अन्वये गुन्हे दाखल केले आहे मात्र या कोळसा चोरी प्रकरणात केवळ कैलास अग्रवाल किंव्हा त्यांचे सहयोगी ट्रान्सपोर्टरच सामील नाही तर कोळसा तस्करांची एक गैंग सुद्धा सामील असल्याने या प्रकरणात वेकोलि सुरक्षा रक्षक कौशल सिंह यांच्यावर प्राणघातक हमला करणारे कोळसा माफियांना सुद्धा पोलिसांनी टार्गेट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात कैलास अग्रवाल यांच्यासह त्यांच्या सहयोगी ट्रान्सपोर्टर सोबतच तब्बल १२ कोळसा माफियांचे सीडीआर ( कॉल्स डीटेल रेकॉर्ड ) पोलिस तपासणार आहे. त्यामुळे या प्रकरणात सामील सर्वांचे एकदुसऱ्यांचे समंध तपासले जाईल आणि कोट्यावधी रुपयांच्या या कोळसा कांडाची पोलखोल होईल अशी शक्यता.