You are here
Home > चंद्रपूर > पोलिस अधीक्षक रेड्डी आज घेणार कोळसा चोरी गुन्ह्याचा आढावा !

पोलिस अधीक्षक रेड्डी आज घेणार कोळसा चोरी गुन्ह्याचा आढावा !

कैलास अग्रवाल सह इतर आरोपी व कोळसा तस्कर गैंगच्या मोबाईल कॉल्स रेकॉर्डची माहिती होणार उघड ? पकडलेल्या कोळसा ट्रक गाड्या पोलिस स्टेशन मधे जमा होणार,  

कोळसा चोरी प्रकरण :

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कैलास अग्रवाल आणि त्यांच्या सहयोगी ट्रान्स्पोर्टरवर घूग्गूस पोलिस स्टेशनमधे कलम 464,465, 468,471,420, 34 आयपीसी अन्वये गुन्हे दाखल झाल्यानंतर पकडण्यात आलेल्या ऐकून २६ कोळसा ट्रक पैकी २ ट्रक घूग्गूस पोलिस स्टेशन मधे जमा आहे तर २४ कोळसा ट्रकची रखवाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी दिवस रात्र करीत आहे. यामधे पोलिस कर्मचाऱ्यांना प्रदूषणाचा मोठा त्रास होत असून हे २४ कोळसा ट्रक पोलिस स्टेशन मधे जमा करावे की ट्रक मधील जमा कोळसा वेकोलि कोळसा डेपो मधे जमा करायचा याबद्दल अजून निर्णय झाला नाही. शिवाय कैलास अग्रवाल व त्यांच्या सहयोगी ट्रान्सपोर्टर सह इतर कोळसा तस्करांची एक गैंग ज्यांच्यावर एका सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हमला करण्याचा गुन्हा दाखल आहे व ही गैंग सुद्धा या कोळसा चोरी प्रकरणात आहे की काय ? याचा तपास घेण्यासाठी या सर्वांचे मोबाईल कॉल्स रेकॉर्ड तपासले जात आहे त्याचा सुद्धा निर्णय जिल्हा पोलिस अधिक्षक मोहेश्वर रेड्डी हे आज घेणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. कोळसा प्रकरण उजेडात यायच्या अगोदरच पोलिस अधिक्षक रेड्डी हे सुट्टीवर गेले होते त्यामुळे काही कारवाई संदर्भातील निर्णय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कोकाटे हे घेवू शकले नसल्याचे बोलल्या जात आहे. मात्र आता पोलिस अधिक्षक रेड्डी हे आज रुजू झाल्यानंतर कोळसा चोरी प्रकरणाच्या तपासला वेग येऊन लवकरच कैलास अग्रवाल व सहयोगी ट्रान्सपोर्टर यांना अटक होईल व कोळसा चोरीच्या या कोट्यावधी घोटाळ्याचा पर्दाफाश होईल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा