You are here
Home > आंतरराष्ट्रीय > अमेरिकी कंपन्यांनी चीनमध्ये व्यवसाय बंद करावा : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकी कंपन्यांनी चीनमध्ये व्यवसाय बंद करावा : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका व चीनदरम्यान व्यापारयुद्ध चांगलेच भडकले आहे. चीनने शुक्रवारी अमेरिकेच्या ७५ अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली. यावर अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ पलटवार करत अमेरिकी कंपन्यांना चीनमधील आपला व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. तत्काळ लागोपाठ ट्विट करून ट्रम्प म्हणाले, “आपल्या देशाने वेडेपणात चीनमध्ये व्यवसाय करताना अब्जावधी डॉलर गमावले. चीन आपली बौद्धिक संपदा चोरून अब्जावधी डॉलर कमवत आहे. मात्र, आता हे घडणार नाही. आता आपल्याला चीनची गरज नाही. वास्तविक चीनला वगळून आपण चांगल्या स्थितीत राहू शकतो.’ ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर अमेरिकी शेअर बाजार चार तासांत ३ टक्क्यांनी घसरला होता. इतर देशांमध्ये कंपन्यांनी तत्काळ नवा पर्याय शोधावा. अमेरिकेसाठी ही नामी संधी आहे.’ ट्रम्प यांनी यासोबत फेडएक्स्, अमेझॉन, यूपीएस कंपन्यांना चीनमधून येणाऱ्या फेंटानिल औषधाची डिलेव्हरी बंद करावी, असे आदेश दिले. या औषधाने दरवर्षी अमेरिकेत १ लाख लोक मृत्युमुखी पडतात, असा दावा ट्रम्प यांनी केला.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा