You are here
Home > चंद्रपूर > चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी फसली, नागरिकांच्या अभिप्रायातून शीद्ध !

चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी फसली, नागरिकांच्या अभिप्रायातून शीद्ध !

सुधीर मुनगंटीवार यांनी हे सत्य स्विकारायलाच हवं !

लक्षवेधी :-

खरं तर एखद्या व्यक्तीला एके दिवशी झटका यावा आणि एखादा निर्णय त्याकरिता घेण्यात यावा अशाच प्रकारची गत ही चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदी संदर्भात घडली आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे नेहमीच म्हणत होते की दारूचे कारखाने हे राष्ट्रवादीचे आणि विक्रेते सुद्धा राष्ट्रवादीचे आणि म्हणून दारूचा पैसा हा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे जातो म्हणून दारूबंदी झाली पाहिजे, चंद्रपूर जिल्ह्यात तसं पाहता राष्ट्रवादीचे दीपक जयस्वाल जर सोडले तर दुसरा असा कुठला नेता मोठ्या प्रमाणात दारू व्यवसायात नाही, मात्र ज्यांचे दारूचे परवाने आणि एजन्सी आहे त्यांना सरकारच्या अधिकारी आणि मंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालावे लागतात.त्यामुळे ज्यांची राज्यात सत्ता तिथे हे दारू विक्रेते दिसत असतात, पण सुधीर मुनगंटीवार यांना एके दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूची भयानकता दिसली आणि त्यांनी निर्णय घेतला की चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करायची, मग त्यांनी आपला निर्णय योग्य कसा आहे हे दाखवण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या कमेटिचे ठराव मागितले, याकरिता काही ठिकाणी अडचणी आल्या पण जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या समितीने दारूबंदी संदर्भात ठराव दिले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. मग त्यांनी हे प्रस्ताव कैबिनेट समोर ठेवले पण यामुळे राज्याचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडेल याकरिता प्रथम चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीला स्वतः तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विरोध केला अशी चर्चा होती, पण चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी केली नाही तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल असा हट्ट सुधीर मुनगंटीवार यांनी धरला असल्याने शेवटी दारूबंदीचा निर्णय झाला, चंद्रपूर जिल्ह्यातील बिअर बार, वाईन शाप, आणि देशी दारूच्या दुकान मालकासह तिथे काम करणारे व त्या दुकानांसमोर आपले चखणा ठेवणारे असे ऐकून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जवळपास ५००० लोकांचा रोजगार दारूबंदीमुळे गेला, शिवाय भाजीपाला, मटण, चिकन , अंडे पुरवठा करणारे वेगळेच.त्यामुळे दारूबंदीचा निर्णय हा चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या आर्थिक मंदीचे कारण ठरला तर दुसरीकडे चोऱ्या करणारे, दादागिरी करणारे, गुंड प्रवृत्तीचे, बदमाश आणि काही राजकीय लोकांना, दारूबंदी ही वरदान ठरली, त्यातल्या त्यात पोलिसांना तर एक पर्वणीच ठरली असे म्हणावे लागेल.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी व्हावी याकरिता श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा ॲन्ड परोमीता गोस्वामी यांनी अनेक आंदोलने आणि यात्रा काढल्या आणि त्यांच्या त्या आंदोलनाची दखलच सरकारला घ्यावी लागली असे चित्र निर्माण केले गेले. पण मग त्यांनी सुचविलेल्या मार्गदर्शक तत्वांचा स्विकार करून सक्तीची दारूबंदी कां करण्यात आली नाही ? हा प्रश्न गंभीर असून ज्या प्रकारे बिहार राज्यात दारूबंदी झाल्यानंतर तेथील सरकारने दारूबंदी संदर्भात एवढे कडक निर्णय घेतले की जर एखाद्याच्या वाहनामधे दारू साठा सापडला तर त्या वाहनांचा सरळ लिलाव होतो.मग खरोखरच तुम्हांला दारूबंदी करायची होती तर त्याची कडक अंमलबजावणी करायला हवी होती की नाही ? . पण तसे झाले नाही आणि विशेष म्हणजे सुरुवातीला सर्वात जास्त अवैध दारू विक्रिमधे आरोपी हे भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवक पदाधिकारी होते. याचा अर्थ ही दारूबंदी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आर्थिक द्रुष्टया बळकट करण्यासाठी तर झाली नाही ना ? असा संशय सुद्धा यायला लागला होता.
आतपर्यंत या फसव्या दारूबंदीच्या खेळात पोलिसांनी तब्बल ३७२१४ गुन्ह्यांची नोंद केली असून ४१९९५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे. ऐकून ९३ कोटी ७० लाख ५० हजार १४८ रुपयाची दारू पाच वर्षात पकडली आहे, यामधे चार चाकी वाहनांची ऐकून संख्या १९१८ असून दोन चाकी वाहनांची संख्या तब्बल ६१०३ आहे. या सर्वांची गोळाबेरीज केली तर पोलिसांनी मुद्देमालासह ऐकून २१९ कोटी ८६ लाख ९८ हजार ८९८ रुपयाचा ऐवज जब्त केला आहे. या सर्व बाबी तपासल्या गेल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल की जर पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळपास ९० कोटीच्या वर अवैध दारू पकडली तर चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने अवैध दारू किती गटकली असेल ? एकीकडे दारूबंदी असतांना वर्धा सारख्या महात्मा गांधीच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या जिल्ह्यात दारू खुलेआम मिळते ते द्रुष्य समोर असतांना चंद्रपूर सारख्या औद्धौगिक जिल्ह्यात दारूबंदी खरोखरच होऊ शकते कां ? हा विचार राजकीय प्रगल्भता असणाऱ्या सुधीर मुनगंटीवाराना कां सुचला नसावा ? याचे आश्चर्यच वाटते, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करून राजकीय स्वार्थ साधण्यापलीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी काही साध्य केलं असेल असं वाटतं नाही.
चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी फसली आणि सरकारचा जाणीवपूर्वक महसूल बुडविण्याचे हे एक छडयंत्र आहे असे दिसत असतांना भाजप विरोधी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दारूबंदीला कडाडून विरोध केला. कधी असंही म्हटलं गेलं की शासनाचा दारूबंदीचा निर्णय हा धोरणात्मक असेल तर राज्याचे धोरण सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर करीताच कां वापरतात ? काय त्यांना अवघा महाराष्ट्र दिसला नाही ? की त्यांची महाराष्ट्रात दारूबंदी करण्याची हिंमत नव्हती ? एक ना अनेक प्रश्न या अनुशंगाने विरोधक सत्ताधाऱ्यांना विचारत असतांना महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले आणि सुधीर मुनगंटीवार यांचा दारूबंदीचा निर्णय फिरविण्याचे चक्र फिरायला लागले.त्यामुळे सत्ताधारी नेत्यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी यशस्वी झाली की फसली हे तपासण्याकरिता यांवर समीक्षा समिती नेमली, या कमेटीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे अभिप्राय नोंदविल्या गेले त्यामधे २ लाख ८२ हजार नागरिकांनी अभिप्राय नोंदवले, यापैकी २ लाख ६१ हजार ९५४ नागरिकांनी दारूबंदी हटवा असा अभिप्राय दिला तर केवळ २० हजार ४५८ नागरिकांनी दारूबंदी हटवू नये असे मत व्यक्त केले. खरं तर १० टक्क्यांपेक्षाही कमी नागरिकांनी दारूबंदी हटवू नये असा अभिप्राय दिल्याने लोकशाही मधे बहुमत हा कायदा असतो त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेच्या बहूमताला अक्षरशः पायदळी तुडवुण जी दारूबंदी केली त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारात मोठा फरक पडला आणि बहुतांश धंद्याला पटकनी बसली, मात्र यामधे सुखी झाले ते चोर. लूचक्के, बदमाश आणि पोलिस, ज्यांना अवैध दारू विक्रीतून आपला खूप मोठा आर्थिक फायदा करता आला. मग असा प्रश्न पडतो की सुधीर मुनगंटीवार यांनी ह्या लोकांसाठीच दारूबंदी केली कां ? आणि जर असे नसेल तर सक्तीची दारूबंदी करण्यासाठी कडक कायदे कां केले नाही ? जेणेकरून दारू विकणाऱ्याना दहा वेळा विचार करायला लावेल ? पण आता त्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने त्यांच्या निर्णयाला चपराक देवून दारूबंदी फसवी होती हे आपल्या अभिप्रायातून दाखवून दिले आहे त्यामुळे दारूबंदी फसली हे सत्य आता सुधीर मुनगंटीवार यांनी स्विकारायलाच हवे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा