You are here
Home > चंद्रपूर > पोलिसांशी साठगाठ करून प्रवीण नामक कोलमाफियांची भर रस्त्यात कोळसा चोरी,

पोलिसांशी साठगाठ करून प्रवीण नामक कोलमाफियांची भर रस्त्यात कोळसा चोरी,

कोळसा तस्करी राजुरा गडचांदूर रोडवर जोरात! 

राजुरा प्रतिनिधी :-

काळ्या सोन्याची जननी असलेल्या चंद्रपूर कोळश्याची तस्करी जोमात सुरू आहे. अनेक छोटे-मोठे पांढरपेशा तस्कर, स्वयंघोषित नेते या व्यवसायात सक्रिय आहेत. रेल्वे साईडिंग पासून तर वेकोलीच्या खदानीतुन मोठ्या उद्योगांकडे जाणारा कोळसा वेकोली चे अधिकारी-रेल्वेचे कर्मचारी व ट्रक ड्रायव्हर यांच्याशी हातमिळवणी करून कोळसा चोरीमध्ये गब्बर झालेला राजुरा येथील कोळसा चोर ‘प्रविण’ आपली पोलिसांशी सांठगांठ असल्याची बतावणी करून कोळसा चोरातून माया जमा केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, उद्योगांना पुरवठा होणाऱ्या कोळशाची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. यासोबतचं रेल्वे साईडिंग वरून कोळसा काढण्यात हातखंडा असलेला राजुरा येथील कोळसा तस्कर ‘प्रविण’ याने तर हद्दचं केली आहे. राजुरा-खामोना-गडचांदुर मार्गावरून ‘प्रविण’ याच्या कोळशांनी भरलेल्या गाड्या हमखास बघायला मिळतात. भर रस्त्यावर कोळश्याचे ट्रक थांबून ‘प्रविण’ याचेसाठी कोळसा खाली करतात, त्यानंतर दिवसाढवळ्या या कोळसा चोराचे मजूर हा कोळसा ट्रॅक्टर मध्ये भरून डोहाळतात. त्याचप्रमाणे कोळसा भरून उद्योगांकडे जाणारी रेल्वे यात ‘प्रविण’ च्या इशाऱ्यावरून अवधीपेक्षा जास्त वेळ थांबविल्या जाते. त्यानंतर याठिकाणाहून याची माणसं रेल्वे वॅगन वरून कोळसा उतरवितात व स्वतःच्या बापाची खदान असल्यागत हा कोळसा खुले आम टोहाळतात. राजुरा येथील पोलिस, एलसीबी यांच्याशी आपली जबरदस्त साठगांठ असून नुकत्याच आपल्या गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. अशी बतावणी करण्यात ही हा मागे-पुढे पहात नाही. अल्पशा मजुरीवर काम करणाऱ्या मजदुरांची जमानत घेतली आपण मात्र अद्याप ही बाहेरचं बसे फिरत आहोत, पोलिसांना प्रत्येक महिन्यात त्यांची धनराशी पोचती होत असते. किती ही पोलिस आले अन् गेले तरी आपले कोण काही बिघडवू शकत नाही, अशा थाटात कोळसा चोर ‘प्रविण’ खुले आम बोलत असतो. सगळ्यांनाच आपण ‘मॅनेज’ केले आहे, आपले कुणीही काही बिघडवू शकत नाही. गुन्हा दाखल करतील, परंतु धंदा मात्र ‘त्योच’ करणार या मगरूरीत वावरणारा ‘प्रविण’ ला स्थानिक पोलिस अर्थपूर्ण सहकार्य करीत असल्याचे बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा