You are here
Home > चंद्रपूर > कैलास अग्रवाल सहित तीन कोळसा माफियां अजूनही फरार ?

कैलास अग्रवाल सहित तीन कोळसा माफियां अजूनही फरार ?

कोळसा चोरी प्रकरण :-

महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन संशयाच्या घेऱ्यात ? 

चंद्रपूर प्रतिनिधी :–

चंद्रपूर तालुक्यातील नागाडा कोळसा टालवर पकडलेल्या २४ ट्रकांची सुरक्षा पोलिसांच्या हाती असून या प्रकऱणामधे कोळसा माफिया कैलास अग्रवाल सह इतर दोन आरोपी अजूनही फरार आहे.मात्र पोलिसांना दिवसरात्र ह्या कोळसा ट्रकांची सुरक्षा करण्यास लावून जो वेळ घालवला आहे व आरोपींना वेळ मिळत आहे त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करणे आवशक झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहातिल सर्वात मोठे कोळसा चोरी रैकेट महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून कोळसा माफिया मागील अनेक वर्षांपासून चालवीत असून अखेर हे कोळसा चोरी रैकेट पोलिसांनी उघड करून देशाच्या संपत्तीची चोरी करणाऱ्या कोळसा माफियांवर गुन्हे दाखल केले आहे. परंतु या प्रकऱणामधे महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक व अधिकारी गुंतले असल्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची चौकशी सीबीआय द्वारे करण्याची मागणी आता जोर पकडू लागली आहे, महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन ही कंपनी खरं तर शासनाची फसवणूक करीत असून वेकोलिप्रशासनाला सुद्धा मूर्ख बनवित आहे. केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील वेकोली कोळसा खाणीतून सबसिडीचा कोळसा बंद झालेल्या विविध कंपन्याच्या नावावर उचल करायचा आणि तो कोळसा माफियांच्या माध्यमांतून खुल्या मार्केट मधे विकून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करायचा हा धंदा गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी खोलात जावून तपास करणे आवश्यक  आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा