You are here
Home > चंद्रपूर > ब्रेकिंग न्यूज :- कोळसा माफिया गैंगचा वारीस दरगाई खान यांच्यावर जीवघेणा हमला,

ब्रेकिंग न्यूज :- कोळसा माफिया गैंगचा वारीस दरगाई खान यांच्यावर जीवघेणा हमला,

क्राईम स्टोरी :-

घूग्गूस पोलिस स्टेशन मधे कोळसा गैंगच्या भीम बिल्डर वर गुन्हा दाखल, सुरक्षा रक्षक कौशल सिंह व वैभव निमकर यांच्यावर झालेल्या हमल्यानंतर पुन्हा एक हमला झाल्याने वेकोलि परिसरात सन्नाटा,

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोळसा माफियांनी वेकोलि कोळसा खाणी ह्या बिहार तंत्राचा वापर करून काबीज केल्याचे चित्र असून दिवसेंदिवस कोळसा माफियांच्या ह्या गुंडाराजाने सर्वसामान्य व्यक्ती हा भयभीत झाला असल्याचे विदारक चित्र वेकोलि कोळसा खान परिसरात निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे तर वेकोलि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करून प्रसंगी त्यांचेवर हमला करून कोळसा माफिया गुंडाची टोळी हीच कैलास अग्रवाल आणि त्यांच्या सहकारी ट्रान्सपोर्टर साठी काम करीत असल्याचे बोलल्या जात आहे. काल दिनांक २ फेब्रुवारीला वैभव निमकर यांचेवर कोळसा माफिया गैंगने हमला केला त्याचे आरोपी अजून सापडले नसतांना आता पुन्हा त्याचं गैंग च्या भीम बिल्डरने हमला करून वारीस खान वर प्राणघातक हमला करून जबर जखमी केल्याने घूग्गूस परिसर हे गुंडागर्दीचे माहेरघर बनले असल्याचे चित्र निर्माण होत आहे, त्यामुळे पोलिस प्रशासनाने या परिसरात कडक बंदोबस्त करून कोळसा माफियांसोबत असलेल्या गुंडाना ठेचून काढणे महत्वाचे झाले आहे. मूळच्या घूग्गूस येथील शास्त्री नगर मधे राहणाऱ्या वारीस खान यांचेवर भीम बिल्डर नामक गुंडानी ट्रक पार्किंगच्या शुल्लक कारणावरून नायगाव चेक पोस्ट येथे मारहाण करून त्याला घूग्गूस येथे आणले व इथे सुद्धा डोक्यावर वार केला असल्याने त्याला घूग्गूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेण्यात आले आहे. व्रुत्त लिहित पर्यंत गुन्हा नोंद करावयाची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा