You are here
Home > चंद्रपूर > पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा आज होणार सत्कार !

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा आज होणार सत्कार !

सत्कार समारोह :-

माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांची उपस्थिती !

चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त जॉबाज आणि कर्तव्यदक्ष असे पोलिस अधिक्षक म्हणून डॉ. मोहेश्वर रेड्डी हे लाभले आहे, त्यांच्या कार्यकाळात अनेक गुंतागुंतीच्या आणि गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास लावण्यात आला, विशेष म्हणजे चंद्रपूर च्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा पोलिस अधीक्षकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला. असे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक डॉ. रेड्डी यांचा चंद्रपूर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राष्ट्रपती शौर्य पदक मिळाल्याबद्दल सत्कार शनिवार ७ मार्च रोजी दुपारी १२.३० ज्येष्ठ नागरिक संघ सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष महादेव पिंपळकर राहतील.
यावेळी माजी कुलगुरू डॉ.
शरद निंबाळकर, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, मनपा आयुक्त संजय काकडे उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाने केले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा