You are here
Home > चंद्रपूर > ब्रेकिंग न्यूज :-गोल्डन रेस्टॉरंटमधे हुक्का पार्टीत अडकले श्रीमंतांचे शहजादे ?

ब्रेकिंग न्यूज :-गोल्डन रेस्टॉरंटमधे हुक्का पार्टीत अडकले श्रीमंतांचे शहजादे ?

रामनगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. गोल्डन रेस्टॉरंटमध्ये हूक्का पार्लर चालवल्या जात असल्याची चर्चा. रेस्टॉरंट मालक जयस्वाल यांनाही चौकशी करिता  पोलिसांनी घेतले ताब्यात.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे विद्यालय व महाविद्यालयात शिकणारी मुले हे मित्रांच्या वाढदिवसाचा आनंद व्यक्त करण्यासाठी किंव्हा एंजॉयमेंट करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत असतात,  यामधे ड्रग्सचा सुद्धा काही वेळा वापर होत असतो अशातच गर्भ श्रीमंतांची मुलं असेल तर मग काय ? हवं ते एंजॉयमेंट होत असतं, असाच एक प्रकार रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील दाताला रोडवर असलेल्या गोल्डन रेस्टॉरंटमध्ये घडला असून चंद्रपूर शहरातील गर्भ श्रीमंतअसलेल्या कुटुंबातील जवळपास १४ ते १५ मुले (त्यात अल्पवयीन ४ ते ५ मुले) तिथे हूक्का पार्टी करीत असतांना उपपोलिस निरीक्षक कापडे यांच्या नेत्रुत्वात पोलिसांनी त्या मुलांना रंगेहाथ पकडले, सोबत हूक्का संदर्भात वस्तू व वोडका दारूचा बंपर जब्त केले व त्यांना अटक करून रामनगर पोलिस स्टेशन मधे आणण्यात आले.
दाताला रोड वरील गोल्डन रेस्टॉरंट हे जयस्वाल नामक व्यक्तीचे असून या रेस्टॉरंटमध्ये नेहमीच गर्भश्रीमंतांची मुले मुली ही एंजॉयमेंट करण्यासाठी इथे येत असतात, मात्र रेस्टॉरंटच्या नावाखाली इथे हूक्का पार्लर चालविल्या जात असल्याची चर्चा असून आज झालेल्या कारवाई मधे दोन ट्रान्सपोर्टर दिग्गजांची मुले व काही व्यापाऱ्यांची मुले सामील असल्याचे पोलिस सूत्रांकडून कळते.  या कारवाई दरम्यान गोल्डन रेस्टॉरंट मालक जयस्वाल यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवन्त्त नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश हाके करीत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा