You are here
Home > भद्रावती > धक्कादायक :-भद्रावतीच्या युवकाची गळफास घेवून आत्महत्या !

धक्कादायक :-भद्रावतीच्या युवकाची गळफास घेवून आत्महत्या !

आपल्या राहत्या घरीच आपली संपवली जीवनयात्रा,  आत्महत्येचे कारण गूलदस्त्यात ? 

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती येथील आनंदनगर विजासन वॉर्डातील राहणाऱ्या शुभम रविकांत उमाटे (२२) याने ६ मार्चच्या रात्रीच्या दरम्यान आपले राहते घरीच गळफास घेवून आत्महत्या केली केल्याची धक्कादायक घटना घडली असून ही आत्महत्या नेमकी कशासाठी केली याचे कारण मात्र गूलदस्त्यात आहे.

मृतक शुभम हा अत्यंत होतकरू आणि चांगला युवक होता असे बोलल्या जात आहे,  आपले आई-वडिलासोबत आनंदनगर येथे तो वास्तव्यास होता. त्याचे वडिल हे वेकोलितील कर्मचारी असून घटनेच्या दिवशी ते आपल्या ड्युटीवर गेले होते. व घरी केवळ आई व शुभम हे दोघेच होते. आई समोरील रुमध्ये झोपली होती व तो बेडरूम झोपलेला होता. सकाळी आई उठून त्याच्या रुममध्ये गेली असता तिचे काळीज जणू फाटले आणि एकच टाहो फोडला, कारण शुभम तेव्हा फॅनला गळफास घेतलेला तिला दिसला. लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेहाची ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली.’

काल दुपारी ३ वाजता मृतकाच्या पार्थिवावर  कुनाडा येथील वर्धा नदी तिरावरील भोगेसर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी काही मान्यवरांच्या उपस्थितीत  शोकसभा घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईकाची उपस्थिती होती. मृतकाच्या पश्चात आई-वडिल, बहीण, काका-काकू असा बराचमोठा आप्त परिवार आहे. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून आत्महत्येचे कारण कळू शकले  नसल्याने शुभमने नेमकी आत्महत्या कां केली ? याची पोलिस चौकशी करणार आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा