You are here
Home > चंद्रपूर > खळबळजनक :-चंद्रपूर विधी महाविद्यालयाच्या परिसरात मानवी अर्ध तुटलेला पाय सापडला,

खळबळजनक :-चंद्रपूर विधी महाविद्यालयाच्या परिसरात मानवी अर्ध तुटलेला पाय सापडला,

क्राईम स्टोरी :-

या घटनेमुळे परिसरात उडाली खळबळ!

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर येथील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील प्रांगणातून निघणाऱ्या तुकूम रोडवरून जात असताना दुपारी 1:30 वाजताच्या आसपास एका शाळकरी मुलाला पायाचा तुकडा पडून दिसताच त्याने घाबरून बाजूच्या वसाहतीतील एका जेष्ठ नागरिकाला माहिती दिली, तो बघून जेष्ठ नागरिकांनी तात्काळ रामनगर पोलीस ठाणे येथे माहिती दिली असता
त्यानंतर लगेच डिबी पथकाने ठिकाण गाठत या गंभीर घटनेची दखल घेऊन “डॉग स्कॉड” ला पाचारण केले असून घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, निरीक्षक प्रकाश हाके उपस्थिती होते, हा नेमका काय प्रकार आहे ? आणि यामागे नेमकी काय स्टोरी आहे याचा अधिक तपास आता सुरू झाला आहे.सुरु आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा