You are here
Home > पर्यावरण > राज्यात पावसाचा इशारा; मुंबई, रायगड, ठाण्यात रेड अलर्ट

राज्यात पावसाचा इशारा; मुंबई, रायगड, ठाण्यात रेड अलर्ट

पाच ते आठ सप्टेंबर या काळात राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे
औरंगाबाद – राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, बुधवारी पावसाने मुंबईला झोडपून काढले. कोकण-विदर्भासह राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पाच ते आठ सप्टेंबर या काळात राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. ५ ते ८ सप्टेंबर या काळात कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. द. महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मुंबईत बुधवारी ठिकठिकाणी १०० ते ३०० मिमी पावसाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मान्सूनचा आस आणि कोकण किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई, रायगड, ठाणे : या जिल्ह्यांत २०० मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता, नाशिक, सातारा, पुणे : ११५ ते २०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता. बीड, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, विदर्भ : ६४.५ ते ११५.५ मिमीपर्यंत पाऊस शक्य, औरंगाबाद, नगर, सोलापूर, जालना, उस्मानाबाद, जळगाव, लातूर : १५ ते ६४.५ मिमीपर्यंत

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा