You are here
Home > नागपूर > नागपुरात पोलिसांकडून लाच स्वरुपात ३ तरुणींची मागणी 

नागपुरात पोलिसांकडून लाच स्वरुपात ३ तरुणींची मागणी 

नागपूर : ब्यूटीपार्लर आणि स्पाच्या मालकिणीवर एमपीडीएची कारवाई न करण्यासाठी दोन पोलिसांनी २५ हजार रुपयांच्या लाचेसह शरीर सुखासाठी ३ मुलींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात मंगळवारी उघडकीस आला. कर्मचारी हे नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा सेलचे कर्मचारी असून एसीबीने या दोघांना सापळ्यात अडकवून अटक केली. लाच आणि शरीर सुखासाठी मुलींची मागणी करणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे सहायक उपनिरीक्षक दामोदर राजूरकर (५६) आणि पोलिस हवालदार शीतलाप्रसाद मिश्रा (५१) अशी आहेत. या दोघांविरुद्ध एसीबीकडे तक्रार आली होती. अमरावती मार्गावरील एका ब्यूटीपार्लरवर अनैतिक प्रकारांच्या संशयावरून दोन वर्षांत गुन्हे शाखेने तीनदा छापे घालून कारवाई केली होती. या पार्लरच्या मालकिणीवर एमपीडीएची कारवाई न करण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेचे कर्मचारी राजूरकर आणि मिश्रा यांनी २५ हजार रुपये आणि शरीर सुखासाठी ३ तरुणींची मागणी केली. एसीबीच्या सापळ्यात हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यावर दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा