You are here
Home > महत्वाची बातमी > युतीच्या जागावाटपाची पहिली बैठक पूर्ण, भाजप 160 तर शिवसेना 110 जागांवर लढण्याची शक्यता

युतीच्या जागावाटपाची पहिली बैठक पूर्ण, भाजप 160 तर शिवसेना 110 जागांवर लढण्याची शक्यता

मुंबई – विधानसभा निवडणुका थोड्याच दिवसांवर आल्या आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यातील निवडणुकीतील जागावाटपाबाबतची पहिली नुकतीच पार पडली. यात भाजप 160 तर शिवसेनेने 110 जागा लढावाव्यात असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात बुधवारी जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत जागावाटपाबाबतचा ठरल्याची माहिती आहे. आज यासंदर्भात दुसरी बैठक होणार असल्याची शक्यता आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप-शिवसेना 270 जागांवर लढणार आहेत. तर उर्वरित 18 जागा मित्र पक्ष लढणार असल्याची शक्यता आहे. या फॉर्म्युलात भाजप 160, शिवसेना 110 आणि मित्र पक्ष 18 लढतील असा फॉर्म्युला पहिल्या बैठकीत ठरवण्यात आला आहे. ठरलेला हा फॉर्म्युला भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांना मंजुर असल्याचे समजते. तसेच 270 जागांपैकी किती जागा वाटून घ्यायच्या याबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा