You are here
Home > चंद्रपूर > बेकिंग न्यूज :-एका नामांकित कॉलेजमधील प्राध्यापकांवर विद्यार्थिनींचा छेडखानीचा आरोप ?

बेकिंग न्यूज :-एका नामांकित कॉलेजमधील प्राध्यापकांवर विद्यार्थिनींचा छेडखानीचा आरोप ?

खरं काय ? खोटं काय ? याबाबत पोलिस संभ्रमात !

चंद्रपूर प्रतिनिधी:-

चंद्रपूर शहरातील एका नामांकित कॉलेज मधील विद्यार्थिनीने एका स्पोर्ट गेम शिकविण्याऱ्या प्राध्यापकांविरोधात लावलेल्या छेडखानीच्या आरोपांमुळे वादळ निर्माण झाले आहे. तुला करियर करायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक सबंध ठेव अशी अपेक्षा प्राध्यापकांनी विद्यार्थिनीपुढे ठेवल्याची तक्रार शहर पोलिस स्टेशन मधे विद्यार्थिनीने दिल्याने आता हे प्रकरण काय वळण घेईल याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
मुळात या तक्रारीत विद्यार्थिनीने नेमकी काय तक्रार दिली ही गोष्ट गूलदस्त्यात आहे मात्र या प्रकरणात राजकीय दबाव पोलिसांवर असल्यामुळे या प्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षक मोहेश्वर रेड्डी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेडकर यांची शहर पोलिस स्टेशन मधे आकस्मिक भेट यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात पोलिस विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीच्या अनुशंगाने तपास करीत असून पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा