You are here
Home > वरोरा > अभिष्टचिंतन सोहळ्याचा अनोखा संगम, दोन दिग्गजांचा वाढदिवस केला साजरा !

अभिष्टचिंतन सोहळ्याचा अनोखा संगम, दोन दिग्गजांचा वाढदिवस केला साजरा !

नगरसेवक विठ्ठल टाले आणि आदिवासी नेते रमेश मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय राजकीय मंडळी आली एकत्र !

वरोरा प्रतिनिधी :-

खरं तर वाढदिवसाच्या निमित्त्याने एका राजकीय व्यक्तीकडे शुभेछा देण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या ही त्यांच्या राजकीय उंचीवर अवलंबून असते, पण जर सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकपणे एखाद्या नेत्यांचा किंव्हा पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस साजरा केला तर काय होईल ? याचा विचार जर केला तर आपल्याला अख्ख्या समाज एकत्र आल्याची प्रचिती येईल.
अगदी अशाच प्रकारचा वाढदिवस वरोरा नगरपरिषदचे नगरसेवक विठ्ठल टाले आणि नुकतीच विधानसभा निवडणूक लढणारे आदिवासी नेते रमेश मेश्राम यांचा एकाच दिवशी वाढदिवस आल्याने त्या दोघांचा वाढदिवस त्यांच्या सर्वपक्षीय मित्रमंडळींनी एकत्र साजरा करून वरोरा नगरीत एक नवा इतिहास रचला आहे अशी प्रतिक्रिया सर्वच मान्यवरांनी याप्रसंगी दिल्या.
वरोरा नगरपरिषदचे नगरसेवक विठ्ठलभाऊ टाले , तसेच आदिवासी संघटनेचे युवा नेता रमेश भाऊ मेश्राम यांचा सर्वपक्षीय अभिष्टचिंतन सोहळा रेल्वे स्टेशन परिसरातील गुप्ता रेस्टॉरंटमध्ये संपन्न झाला . यावेळी नगरसेवक, सन्नी भाऊ गुप्ता , माजी नगरसेवक रामदर्शन जी गुप्ता , राष्ट्रवादी चे नेते विलास भाऊ नेरकर , बांधकाम सभापती छोटुभाई शेख ,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ कुकडे , युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख मनीष भाऊ जेठानी, विदर्भ लोकसेनेचे नेते प्रवीण भाऊ सुराणा , प्रहारचे आशिष घुमे , आपचे दीपक गोंडे , साखरा येथील सरपंच दिनेशभाऊ मोहारे, पत्रकार सूरज घुमे , पत्रकार बबलुजी दुगड , सामाजिक कार्यकर्ते किशोर भोयर आलेख रठ्ठे इत्यादींची उपस्थित होती.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा