You are here
Home > भद्रावती > महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या भद्रावती शाखेची कार्यकारणी गठित !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या भद्रावती शाखेची कार्यकारणी गठित !

अध्यक्ष ईश्वर शर्मा तर कार्याध्यक्ष म्हणून अशोक पोतदार यांची निवड!

भद्रावती प्रतिनिधी उमेश कांबळे :-

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई ही पत्रकारांची संस्था महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यात कार्यरत असून पत्रकार संरक्षण अधिनियम २०१७ हा कायदा पहिल्यांदाच महाराष्ट्रात लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मोठी कामगिरी होती आणि त्यांच्या सतत पाठपुराव्यामुळेच हा कायदा महाराष्ट्र शासनाला करावा लागला, अर्थात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यशील अश्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जाळे महाराष्ट्रात सर्वत्र बघावयाला मिळत आहे, चंद्रपूर जिल्ह्यात तर या संघाचे ऐकून ३५० पेक्षा जास्त सदस्य कार्यरत आहे.
अशा या महाराष्ट्रव्यापी पत्रकार संघाची शाखा भद्रावती येथे नुकतीच जाहीर करण्यात आली, दिनांक १५ मार्च ला सेलिब्रेशन हाल भद्रावती येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची भद्रावती तालुका शाखा कार्यकरिणी गठीत करण्यात आली. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी अशोक पोतदार होते, ११ सदस्य असलेल्या या तालुका शाखेची सभा संपन्न होऊन यात सर्व संमतीने कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्ष-ईश्वर शर्मा (दैनिक.नवभारत), कार्याध्यक्ष-अशोक पोतदार
(दैनिक.लोकमत समाचार)
उपाध्यक्ष-वतन लोणे (दैनिक.लोकमत)
सरचिटणीस-अब्बास अजाणी.
(राखणदार) संघटक-जावेद शेख.
(सी TV.9) प्रसिद्धी प्रमुख-उमेश कांबळे, कार्यकारिणी सदस्य-
रूपचंद धारणे-दै.तरूण भारत. सुनिल बिपटे-दैनिक.पुण्यनगरी शंकर बोरधरे-युवाराष्ट दर्शन. संतोष शिवनकर, महेश निमसट्कार् आदि पत्रकाराची उपस्थिति होती, या नवनियुक्त पदाधिकारी व कायकारिणी सदस्य यांचे पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प़ा.महेश पानसे, चंद्रपूर जिल्हा अ्ध्यक्ष-सुनिल बोकडे,काया॔ध्यक्ष जितेंद्र चोरडिया, जिल्हा सरचिटणीस राजू कुकडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प़ा.धनराज खानोरकर, यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा