You are here
Home > चंद्रपूर > ग्राहक पंचायत महाराष्ट्र चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित…

जिल्हाध्यक्ष म्हणून  तुण्डुलवार, उपाध्यक्ष म्हणून वेदांत मेहरकूरे तर सचिव पडी आनंद मेहरकूरे यांची नियुक्ती !

चंद्रपूर प्रतिनिधी :- 

स्थानिक भवानीमाता सभागृहात पार पडलेल्या चंद्रपूर जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे विदर्भ सचिव लीलाधर लोहारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. याप्रसंगी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष म्हणून परशुराम जी तुंडूलवार तर जिल्हा उपाध्यक्ष पदी वेदांत मेहेरकुरे व सचिव म्हणून आनंद मेहरकुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
राज्यासह केंद्र पातळीवर ग्राहकांचा मूलभूत हक्क व त्यांचे समस्यांचे निराकरण करण्याकरिता सदैव तत्पर असलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संघटना गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असून ग्राहकांना न्याय देण्यासाठी धडपड करीत आहे. संघटनेचे आराध्य दैवत थोर पुरुष स्वामी विवेकानंद व संघटनेचे ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या सदर संघटनेचे कार्य संपूर्ण जिल्हाभरात व ग्रामीण पातळीवरीरही पोचवण्याच्या उदांत हेतूने विदर्भ सचिव लीलाधर लोहारे यांनी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केलेली आहे. त्यात जिल्हाध्यक्ष म्हणून परशुराम तुंडूलवार, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून वेदांत मेहरकुळे, सचिवपदी आनंद मेहर कुरे, सहसचिव किशोर बांते ,संघटक म्हणून जनार्दन दगडी, सहसंघटक म्हणून महेश काहील कर, कोषाध्यक्ष म्हणून शेंडे , कायदेविषयक सल्लागार म्हणून एडवोकेट राजेश विरानी तर महिला जिल्हाध्यक्ष म्हणून सारिका बोराडे , प्रसिद्धीप्रमुख म्हणून पूर्णीमा बावणे, तर महिला सल्लागार म्हणून छबुताई वैरागडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांत मेहर कूरे , प्रस्ताविक परशुराम तुंडूलवार यांनी तर आभार जनार्दन धगडी यांनी मानले. याप्रसंगी बहुसंख्येने ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा