You are here
Home > चंद्रपूर > खतरनाक अपघात :-पडोली पोलिस स्टेशन समोरच शाळकरी मुलाचा अपघातात दुर्दैवी म्रुत्यु

खतरनाक अपघात :-पडोली पोलिस स्टेशन समोरच शाळकरी मुलाचा अपघातात दुर्दैवी म्रुत्यु

पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर जनतेचा आक्रोश !

चंद्रपूर प्रतिनिधी :-
पडोली पोलिस स्टेशन हे अगदी मुख्य रस्त्यावर असून नागपूर-घूग्गूस-चंद्रपूर हे मार्ग असलेल्या या ठिकाणी क्षणाक्षणाला हेविवेट गाड्यांची व इतर गाड्यांची रेलचेल मोठ्या प्रमाणात होतं असते, अशातच पडोली पोलिस स्टेशन मधे वाहतूक पोलिस असले तरी ते नेमके कुठली वाहतूक तपासतात याबाबत संभ्रम असून पडोली चौकात अनेक अपघात होत असतांना आता तर चक्क पोलिस स्टेशन समोरच एका  शाळेकरी मुलाचा अपघात होऊन तो जागीच म्रुत्यु झाल्याने पोलिसांच्या वाहतूक नियंत्रनेचे तीन तेरा वाजले असल्याचे दिसते. विद्यानिकेतन शाळेत दहावीचा पेपर संपल्यानंतर आपल्या बहिणीला स्कुटीने  आणताना एका भरधाव वेगाने आलेल्या ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात भावाचा जागीच म्रुत्यु झाल्याने परीसरात मोठी गर्दी झाली होती व पोलिसांवर उपस्थित नागरिक आक्रोश व्यक्त करत होते. या घटनेतून पोलिस प्रशासन जागेल कां ? हा प्रश्न मात्र तेवढाच गंभीर आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा