You are here
Home > Breaking News > कलीयुगातील राम सीता

कलीयुगातील राम सीता

सोशल मिडीया आजच्या युगातील अतिशय जलद संवादाचे साधन होत आहे़ अशातच मदतीची हाक असो अथवा समस्यांची निवेदने मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयाचा वापर पहायला मिळतो आहे़. अशातच काही दिवसांपासून एक माहिती सोशल मिडीयावर सर्वत्र फिरत आहे़यात एका वयोवृद्ध दाम्पत्याबाबतची माहिती काही युवकांनी प्रसिद्ध केल्यानंतर ‘कलीयुगातील रामसिता’ हा उल्लेख सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे़.

आज कोपरगाव येथून येत असताना रोड च्या कडेने एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं माझी नेहमीची सवय असल्यामुळं मी त्या भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं सहजच जेवनाच विचारलं तर ते नको म्हणाली मग मी त्यांना100 रुपये देऊ केले तर ते सुद्धा नको म्हणाले ,मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय मग सुरू झाला त्यांचा जीवनपट ,- ते 2200 km चा प्रवास करून आता द्वा रका ला स्वतःच्या घरी चालले होते त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशान करून उपयोग नाही मग माझ्या आईने डॉक्टर ला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्री कृष्णा मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूर ला जाऊन परत द्वारकेला पायी येइल म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय ,मग मी त्यांच्या बायको विषयी विचारलं तर ति पण मला एकटं सोडायला तयार नव्हती व रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करायला येते म्हणून निघाली मग मी ते 25%हिन्दी 75%इंग्रजी बोलत असल्यामुळे शिक्षण विचारलं तर माझी बुद्दी ऐकून सुन्न झाली त्यांनी लंडन येथे ऑक्सपोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये 7 वर्षे खगोलशास्त्र यावर पी एच डी केलीय तर त्यांच्या बायकोने मनोविकार शास्त्र या विषयावर लंडन येथेच पी एच डी केलीय (एवढ शिकून सुद्दा त्यांच्या चेहऱ्यावर गर्व सुद्धा नाही नाहीतर आपल्या कडे 10 नापास वालासुद्धा छाती ताणून हिंडतो ) एवढच नाहीतर सी रंगराजन (गव्हर्नर) यांचे बरोबर ,तसेच कल्पना चावला ह्यांच्या बरोबर काम व मैत्रेचे समंध होते तसेच त्यांना मिळणारे मासिक पेन्शन ते एक अंध ट्रस्ट ला ते देऊन टाकतात सद्या ते सोशल मेडियापासून लांब राहतात ,रोडच्या कडेन जाणार प्रत्येक जोडपं भिकारी असतच अस काही नाही एखाद जोडपं हे आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला तयार होत आणि आपल्या पतीसोबत कोणी सीता सुद्धा होत म्हणूनच आज भेटलेली माणसे कली युगातील मी तर राम सीता च समजतो त्यांचे नाव
डॉ. देव उपद्याय व डॉ. सरोज उपद्याय

लेख-प्रमोद आसने
9511255711
रवींद्र आसने
9226430020

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा