You are here
Home > चंद्रपूर > सफाई कामगारांना मास्क, सेनीटायझर द्या – आप

सफाई कामगारांना मास्क, सेनीटायझर द्या – आप

कोरोना व्हायरसवर प्रतिबंधात्मक उपाय ! 

चंद्रपूर/मूल  :-

देशात व राज्यात सध्या कोरोना व्हायरसचे पार्श्वभूमीवर मूल नगर परिषदेने सफाई कामगारांना मास्क आणि सेनीटायझरसह सुरक्षेची साधने पुरवावी अशी मागणी आम आदमी पार्टीने मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांचेकडे केली आहे. या मागणीची दखल घेत तातडीने मास्क उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी आपच्या शिष्टमंडळाला दिली.
सध्या मास्कचा तुटवडा असून, नगर परिषद तातडीने बचत गटाचे मार्फतीने मास्कची निर्मीती करीत असून, तातडीने सफाई कामगारांना मास्क व इतर सुरक्षेची साधने देण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिले.
देशात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व स्तरावर काळजी घेतल्या जात आहे व हा विषाणू पसरू नये यासाठी नागरिकांनाही सतर्क केले जात आहे. नगर परिषद मूल यांचेकडूनही यासाठी जनजागृती केली जात आहे. असे शहराची सफाई करणाऱ्या सफाई कामगारांना अत्यावश्यक असलेले माॅस्क, सेनीटायझर, हॅन्डग्लोज दिल्या गेले नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून, सफाई कामगारांच्या व नागरिकांच्या आरोग्याबाबत नगर पंचायत गंभीर नसल्याचे द्योतक आहे, असे आम आदमी पार्टीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सफाई कामगारांना, सुरक्षेची सर्व साधने देण्याबाबत शासनाने वेळोवेळी आदेश निर्गमित केले आहेत, सध्या आणीबाणीची परिस्थिती असताना सुद्धा नगर पंचायतने सफाई कामगारांच्या संदर्भात उदासीन भूमिका घेणे ही बाब अत्यंत गंभीर आहे.
सफाई कामगारांच्या व नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता सर्व सफाई कामगारांना माॅस्क, सेनीटायझर, हॅन्डग्लोज तातडीने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिध्दावार, आप युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव शामकुळे, स्थानिक कार्यकर्ते अमीत राऊत, प्रकाश चलाख, पियूष रामटेके, विजय वैरागडे उपस्थित होते.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा