You are here
Home > चंद्रपूर > धक्कादायक :- कोळसा माफिया कैलास अग्रवाल यांचा नागपूर येथे तीनपट धंदा ?

धक्कादायक :- कोळसा माफिया कैलास अग्रवाल यांचा नागपूर येथे तीनपट धंदा ?

अजूनही कित्तेक कोळसा माफिया मोकाट, नागपूरमधे दिलीप अग्रवालच्या माध्यमातून सबसिडीच्या कोळशाची खुल्या बाजारात विक्री ! बेकायदेशीर कोळसा टाल बनले कोळसा चोरीचे अड्डे.

चंद्रपूर प्रतिनिधी :

एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील नागाडा व पडोली परिसरातील बेकायदेशीरपणे चालणारे कोळसा टाल हे कोळसा चोरीचे अड्डे बनले असतांना आता त्यापेक्षा तीनपट कोळसा स्टॉक हा नागपूरच्या बेकायदेशीर कोळसा टालवर असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास केला नसल्याने कोळसा माफिया कैलास अग्रवाल आणि त्यांचे बंधू पोलिसांच्या कारवाईतून अलगद सुटले असल्याचे दिसत आहे,

मागील महिन्यात १७ फेब्रुवारीला जो कोळसा घोटाळाउघडकीस आला तो कोट्यावधीचा असून यामधे कैलास अग्रवाल आणि इतर दोन आरोपीवर लावलेले गुन्हे इथपर्यंतच पोलिसांचा तपास झाला असून बाकी आरोपी अजूनही मोकाट आहे. खरं तर दिनांक १६ फेब्रुवारीला जैन ट्रान्स्पोर्टचे दोन ट्रक पोलिसांनी पकडल्याच्या बातम्या झळकल्या त्या जैन ट्रान्स्पोर्टच्या दोन गाड्या बद्दल काय झालं ? याचा पत्ता नंतर लागला नाही आणि म्हणूनच कैलास अग्रवाल याना याचाच फायदा घेवून स्वतःची न्यायालयातून सुटका करून घेण्याची संधी मिळाली असावी असा अंदाज आहे कारण पोलिसांनी ज्या पद्धतीने तपास करून न्यायालयाचे ताशेरे ओढवून घेतले
त्यावरून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असे दिसते, कुठल्याही गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तो गुन्हा न्यायालयात टिकला पाहिजे याकरिता पोलिसांचा तपास हा अतिशय शूस्म पद्धतीने असायला हवा, मात्र या प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर गुन्हे दाखल करण्यासाठी जेवढी तत्परता दाखवली तेवढीच तत्परता जर न्यायालयापुढे पुराव्यानिशी दस्तऐवज दाखल करण्यासाठी दाखवली असती तर कैलास अग्रवाल यांना अटकपूर्व जामीन मिळाला नसता,

महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या अधिकारी यांच्यासोबत असलेले कोळसा माफियांचे साटेलोटे यामुळे सबसिडीचा कोळसा खुल्या मार्केटमधे विकला जातो याची पोलखोल सन १०१३ मधे झाली होती, त्या प्रकरणात पोलिसांनी अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले होते अशी चर्चा होती मात्र त्यांच्यापेक्षा हा कोळसा घोटाळा मोठा असून कैलास अग्रवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जे गुन्हे दाखल झाले, त्यांच्यासोबतच इतर कोळसा माफियांना यामधे पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे, कारण ज्याअर्थी जैन ट्रान्सपोर्टच्या गाड्या अगोदरच पकडल्या त्या जैनचे नेनके काय झाले ? हेच कळायला मार्ग नसून यामधे पोलिसांच्या तपासाची संदिग्ध भूमिका दिसत आहे.आणि त्यामुळेच एवढा मोठा कोळसा घोटाळा आता जणू घडलाच नाही अशी परिस्थिती दिसत आहे. या संदर्भात नागपूर येथील मोठ्या प्रमाणात अग्रवाल आणि जैन बंधू यांचा चोरीच्या कोळशाचा व्यापार सुरू आहे त्याची इंतभूत चौकशी केल्यास ह्या प्रकरणाची पूर्ण पोलखोल होऊ शकते.त्यामुळेच हा तपास सीबीआय तर्फे करण्यात यावा अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा