You are here
Home > चंद्रपूर > चंद्रपूरात सर्वांना घरात राहण्याची सूट, मग पाणी पुरवठा करणारे कामावर कसे ?

चंद्रपूरात सर्वांना घरात राहण्याची सूट, मग पाणी पुरवठा करणारे कामावर कसे ?

चंद्रपूर मनपा प्रशासनाची ही कसली संचारबंदी ? 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

एकीकडे देशात संचारबंदी लागू करून मोदी सरकारनी देशातील जनतेला सकाळी ७,०० वाजेपासून घरातून बाहेर पडू नका असे आव्हान केल्यानंतर सर्वच राज्यातील शहरातील जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थेने सुद्धा मोठं मोठे होर्डिंग्ज लावून आव्हान केले की शहरात संचारबंदी पाळा, कुणीही सकाळी ७ च्या नंतर बाहेर पडू नका, मग शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कामगारांना कोरोना होणार नाही कां ? काय ते या शहराचे नागरिक नाही ?
या संदर्भात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी याची दखल घेवू नये हे आश्चर्यच म्हणावे लागेल, मात्र यामुळे आम्हची महानगरपालिकेला कदर नाही ही गोष्ट पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनाला वेदना देणारी आहे. आणि सर्वसामान्य जनतेला मनपाची ही  कसली संचारबंदी ? हा प्रश्न पडायला लागला आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा