You are here
Home > चंद्रपूर > धक्कादायक :-कलकाम या गुंतवणूक कंपनीने बुडवले ग्राहकांचे कोट्यावधी रुपये !

धक्कादायक :-कलकाम या गुंतवणूक कंपनीने बुडवले ग्राहकांचे कोट्यावधी रुपये !

पैसे बुडल्याच्या व भाडोत्री गुंडाकडून मिळालेल्या धक्क्याने गणेश कविटकर यांचा मृत्यु ?

पोलिस प्रशासनाने दखल घेवून कंपनीचे विदेश रामटेके यांना अटक करण्याची ग्राहकांची मागणी !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात ग्राहकांकडून विविध आमिषे दाखवून कोट्यावधीची गुंतवनुक केली मात्र मूद्दत संपल्यानंतर जेंव्हा रक्कम परत करण्याची वेळ आली तेंव्हा मात्र कंपनी व्यवस्थापनाने काही भाडोत्री गुंडाकडून ग्राहकांना धमकावने सुरू केले, यामधे या कंपनीचे एजंट सुद्धा संकटात असून अशाच एका गणेश काविटकर नावाच्या एजंटला व ग्रुप लीडरला सुद्धा त्यांच्या ग्राहकांना पैसे परत मिळणार नाही आणि सोबत कंपनीच्या संचालकांनी काही भाडोत्री गुंड वापरून त्यांच्याकडून धमकी त्यांना मिळाल्याने त्यांचा धक्क्याने  दिनांक 19 फरवरी 2020  ला आकस्मिक म्रुत्यु झाला, तूकूम येथील ग्रुप लीडर म्हणून या कंपनीत कार्यरत असणारे गणेश काविटकर त्यांनी मार्केटमधे ९० लाखाचे चेक स्वतःचे दिले होते, मात्र कंपनी कडून ग्राहकांच्या पैशाची कुठलीही शाश्वती मिळाली नसल्याने एवढेच नव्हे तर कंपनीच्या भाडोत्री गुंडांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने पूर्णतः घाबरलेले गणेश यांना मोठा धक्का बसला व त्यातच त्यांचा आकस्मिक म्रुत्यु झाला,

विदेश रामटेके संचालक असलेल्या कलकाम या कंपनीचे मुंबई वाशी येथे असलेले कार्यालय बंद झाले असून त्यांनी तनिष्का मल्टी अग्रॉ सर्वीसेस या नावानी दुसरी कंपनी खोलुन त्यातून सुद्धा ग्राहकांची लूट चालवली आहे, विदर्भातून या कंपनीमधे गुंतवणूकदारांची संख्या दहा हजारच्या वर गेली असल्याने व कंपनी ग्राहकांचे पैसे परत न देता काही भाडोत्री गुंडाकडून ग्राहकांना धमकावीत असल्याने ग्राहक पोलिस तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याची माहिती आहे.मात्र या कंपनीच्या विदेश रामटेके या संचालकांची पोलिस विभागाने चौकशी केल्यास दुर्दैवी म्रुत्यु झालेल्या गणेश काविटकर यांच्या म्रुत्युचे रहस्य उलगडू शकते, या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षकांना तक्रार देण्यात येवून प्रसंगी मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येणार असल्याचे विशेष सूत्रांकडून कळले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा