You are here
Home > कोरपणा > कोरपणा येथे जनतेने पाळली संचारबंदी, दुकाने बाजारपेठ बंद रस्त्यात शुकशुकाट !

कोरपणा येथे जनतेने पाळली संचारबंदी, दुकाने बाजारपेठ बंद रस्त्यात शुकशुकाट !

जनतेचा उत्स्पूर्त प्रतिसाद !

कोरपना प्रमोद गिरडकर :

देशात कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातर्फे जनतेने स्वतःहून लावलेली संचारबंदीची घोषणा आता १०० टक्के यशस्वी होताना दिसत असून चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील सर्व बाजारपेठ व दुकाने बंद ठेवून जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. आज सकाळी ७ वाजेपासून ठाणेदार सोबत पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरात गस्त देवून नागरिकांना स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आव्हान केल्यानंतर नगर पंचायत अधिकारी तहसीलदार यांनी सुद्धा शहरात फिरून जनतेला सूचना दिल्या होत्या त्या सूचनेचे काटेकोरपणे जनतेने करून जनतेने जनतेसाठी केलेली संचारबंदी यशस्वी केली,
प्रथमच शहरातील दवाखाने व मेडिकल सुद्धा बंद दिसले,केवळ ग्रामीण रुग्णालय एमरजेंसी साठी सुरु होते, जिल्हाधिकारी यांचा आदेशानुसार काल ६,००वाजे पासून किराना भाजीपला मेडिकल, व दवाखाने, वगळता सम्पूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली होती.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा