You are here
Home > चंद्रपूर > संचारबंदी दरम्यान अरेरावी करणाऱ्या तनशिद खान व इतरांविरोधात गुन्हे दाखल !

संचारबंदी दरम्यान अरेरावी करणाऱ्या तनशिद खान व इतरांविरोधात गुन्हे दाखल !

पोलिसांवरच रौब दाखवणाऱ्या दोघांची जिल्हा कारागृहात रवानगी!

चंद्रपूर प्रतिनिधी :

भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नागरिकांना होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी देशात २१ दिवसाची संचारबंदी लावली आहे, मात्र नागरिकांना ही संचारबंदी म्हणजे खेळ वाटतं असून पोलिस प्रशासन एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरातील चप्पे चप्पे छानुन नागरिकांना घरातच राहण्याचा आग्रह करीत आहे, असे असतांना पोलिसांच्या या संचारबंदीला आपण सहकार्य करणं हे नागरिकांच कर्तव्य आहे, परंतु चंद्रपूर शहरातील तूकूम परिसरात तनशिद खान राजा व नजमा खान राजा यांनी बंदोबस्तात असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र किशनराव बोबडे हे जमाव हटविण्याकरिता गेले असता त्यांना आरोपींनी शिवीगाळ देवून त्यांच्यासोबतच हुज्जत घातली असल्याने रामनगर पोलिस स्टेशन येथे तनशिद खान राजा वय २६ वर्ष आझाद चौक तुकुम चंद्रपुर यांचे विरूध्द कलम 353, 332, 427, 186, 189, 188, 269, 294, 506, 34 भादवी सहकलम 51(ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अन्वये व नजमा खान राजा खान दोन्ही रा आझाद कायदा, कलम 37 (3) 135 म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जिल्ह्यात संचारबंदी असल्याने या दोन्ही आरोपींची चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांकडून कळले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा