You are here
Home > चंद्रपूर > धक्कादायक :-चंद्रपूर शहरातील मस्जिदीत लपून असलेल्या विदेशी नागरिकांना पोलिसांनी केली अटक!

धक्कादायक :-चंद्रपूर शहरातील मस्जिदीत लपून असलेल्या विदेशी नागरिकांना पोलिसांनी केली अटक!

धार्मिक स्थळ असलेल्या मस्जिद प्रशासनाने माहिती लपवली, विदेशी नागरिकांचा व्हिसा केला जब्त !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

देशात सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून संचारबंदी लावली असतांना व बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला योग्य तपासणी करूनच 14 दिवस होम क्वॉरेंटाइन राहण्याचे सक्त आदेश असतांना काही नागरिक हे नियम पाळत नाही एवढेच नव्हे तर
खबरदारी म्हणून विदेश, तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्यांनी प्रशासनाला स्वत: माहिती देण्याचे आवाहन करण्यातआले आहे पण धार्मिक स्थळाच्या आडोशाने ते आपली वैद्यकीय तपासणी करून घेत नाही पर्यायाने शहरातील इतर नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर त्याला जबाबदार कोण ? हा प्रश्न निर्माण होतं आहे. काळ दिनांक २५ मार्चला चंद्रपूर शहरातील तूकूम परिसरातील एका मश्जिदमधे आसरा घेत विदेशी नागरिक लपून असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच एकच खळबळ उडाली होती त्यात तुर्कीस्तान येथून 11, दिल्ली, ओडिसा आणि केरळ येथून आलेले प्रत्येकी 1 अशा एकूण 14 व्यक्तीचा समावेश होता, पोलिसांनी 25 मार्च बुधवार ला दुपारी तिथे छापा टाकला असता विदेशातून आलेले काही नागरिक तेथे आढळल्याने त्यांचे व्हीसा जप्त करत त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली, यापैकी विदेशातून आलेल्या 11 व्यक्तींना ताब्यात घेऊन तपासणीकरिता त्यांचे नमुने घेऊन विलगीकरणात पाठविण्यात आले व इतर तिघांनाही होम क्वॉरेटाइन पाळण्याचे बजाविण्यात आले आहे. हे विदेशी नागरिक 3 मार्च पासूनच येथे वास्तव्यास असल्याची माहिती असून या मश्जिद प्रशासनाने ही माहिती कां लपवून ठेवली ? याची चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा