You are here
Home > चंद्रपूर > पोलिस अधिकारी दिपक मैस्के आणि रायटर लालू यादव यांची गुंडागर्दी !

पोलिस अधिकारी दिपक मैस्के आणि रायटर लालू यादव यांची गुंडागर्दी !

कुलदीप धावा संचालक व राजू चिन्नेवार यांना बेदम मारहाण, पोलिस कस्टडीत ठेवण्याच्या नावाखाली आरोपीकडून घेतले १५ हजार, तरीही दारूच्या एका बॉटलची बनवली केस, बंगाली कैन्प पोलिस चौकी अंतर्गत अवैध दारू विक्रेत्यांकडून लाखोंची वसुली?

पोलिसनामा :

चंद्रपूर प्रतिनिधी :-

रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंगाली कैम्प पोलिस चौकीचे प्रमुख असलेल्या दिपक मैस्के यांनी त्या परीसरात मोठी दादागिरी करून अवैध धंदेवाईक यांच्याकडून हप्ता वसुली चालविली असल्याची चर्चा असतांनाच आता नुकत्याच एक दिवशीय देशव्यापी संचारबंदीच्या रविवारला संजय नगर एमईएल परीसरात असलेल्या कुलदीप धावा संचालकांना व तिथे आलेल्या एका राजू चन्नेवार नावाच्या व्यक्तीला पोलिस उप निरीक्षक दिपक मैस्के व त्यांचा रायटर लालू यादव यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली, एवढेच नव्हे तर उलट त्यांचेवरच एका दारूच्या बॉटलची केस बनवली व पन्नास हजार दे अन्यथा पोलिस लॉकअप मधे टाकतो असे धमकावून त्यांचेकडून १५ हजार रुपये घेतल्याची बाब आता उघड झाली आहे.
संजय नगर परीसरात कुलदीप धावा चंदनखेडे नावाचे ग्रूहस्त चालवितात मात्र तिथे दारूची अवैध विक्री होतं नाही पण तिथे गेलेल्या काही लोकांकडून कधी कधी स्वतः घेवून आणलेली दारू पितात हे सत्य आहे, उपपोलिस निरीक्षक मैस्के यांचा खबरी हेमंत वाढई यांनी त्यांच्याकडे पोहचवली आणि चंदनखेडे यांच्याकडून  किमान पाच हजार हप्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. परंतु मी दारू विकत नाही मग हप्ता द्यायचा कसा ? असा सवाल करून चंदनखेडे यांनी मी पोलिस निरीक्षक हाके साहेब यांच्याशी बोलतो म्हणून खबरी मैस्के  (हेमंत वाढई यांच्यामार्फत) यांना हप्ता देण्यास नकार दिला. अगदी याचाच बदला घेण्यासाठी उपपोलिस निरीक्षक मैस्के यांनी संचारबंदीच्या दिवशी कुलदीप धावा संचालक धाब्यावर असल्याचे खबरी कडून माहिती करून त्यांच्या धाब्याची झडती घेतली व आता बंद मधे तू धावा कसा काय सुरू ठेवला ? असे म्हणून त्यांना व त्याचेसोबत असलेल्या नौकर आणि राजू चिन्नेवार याला बेदम मारहाण केली.यामधे चंदनखेडे यांच्या पाठीवर व हातावर बेदम मारहाण केल्याने रक्ताचे वर आले. सोबत असलेल्या राजू चिन्नेवार यांना तर पार सूजवूण टाकले होते, मात्र पोलिस केस होईल या भितीने त्या दिवशी चंदनखेडे यांनी माझ्यावर कारवाई करा पण माझ्या नौकर व राजू चिन्नेवार याला सोडा असे म्हणून स्वतःला पोलिसांच्या हवाली केले.
आता तुझ्यावर पोलिस केस होऊन तुला आजच्या दिवस पोलिस कोठडीत ठेवतो नाहीतर पन्नास हजार दे असे खबरी हेमंत वाढई कडुन मैस्के यांनी सांगितले मात्र मी काही गुन्हा केला नाही आणि मी पन्नास हजार रुपये देणारं नाही, असे म्हटल्यावर शेवटी पोलिस केस करण्यापेक्षा पोलिसांना पैसे दिलेले बरे असे चंदनखेडे यांना एका पोलिसांनी सांगितल्यावर हा सौदा १५ हजारांत ठरला व पैसे त्याचं रात्री देण्यात आले.मात्र चंदनखेडे यांच्याकडून १५ हजार नगदी घेऊन सुद्धा एका दारूच्या बॉटल ची शेवटी पोलिस केस केलीच.
त्यामुळे उपपोलिस निरीक्षक यांची हप्ता वसुली काय आहे हे यावरून दिसून येते. प्राप्त माहिती नुसार बंगाली कैम्प परीसरात मैस्के आणि त्याचा रायटर लालू यादव ज्याच्या अंगात गुंडगिरी येतेय आणि  ते दोघेही लाखोंची हप्ता वसुली करीत असल्याची चर्चा आहे. या संदर्भात रामनगर पोलिस स्टेशन चे कर्मचारी सुद्धा दबक्या आवाजात या गोष्टीला दुजोरा देत असल्याने उपपोलिस निरीक्षक यांच्यावर वरिष्ठ स्तरावरुन कारवाई कारवाई अशी मागणी होतं आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा