You are here
Home > मुंबई > पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर

पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर

कोल्हापूर – कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 107 बंधारे गेले पाण्याखाली गेली. सध्या जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून एनडीआरएफचे 2 पथक दाखल झाले आहेत. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोल्हापूर शहराजवळील शिरोलमध्ये राष्ट्रीय महामार्गावर पाणी आले आहे. यामुळे आज रात्रीपासून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात येणार आहे. यामुळे पुण्याहून कोल्हापूर-बेळगाव-बंगळुरुरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे.

दरम्यान न्यू पॅलेसमागील सन सिटीमध्ये मध्यरात्री पुराचे पाणी घुसले. येथे 500 हून अधिक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. शिरोल आणि कोल्हापूर येथे एनडीआरएफच्या टीमचे बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत 85 नागिरकांना बाहेर काढण्यात आले. अद्यापही इतर लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

वेळ पडल्यास एअर लिफ्टिंग करु – मुख्यमंत्री पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असून शिरोळा, कोल्हापूर शहर, हातकलंगणे, चिखली आदी गावांना पुराचा तडाखा बसला आहे. या गावांतील पुरात अडकलेल्या नागिरकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. आतापर्यंत 1500 जणांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान राज्यातील पूरस्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे पूरस्थितीची पाहणी करतील. मी उद्या राज्यातील पूर स्थितीचा आढावा घेणार आहे. कोल्हापूरात 2 एनडीआरएफच्या तुकड्या कार्यरत असून आणखी 2 तुकड्या पोहोचतील. हवाई दलाची मदत लवकरच तेथे दाखल होईल. वेळ पडल्यास एअर लिफ्टिंग करू असे मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ येथे सांगितले.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा