You are here
Home > वरोरा > कौतुक :-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम लॉकडाऊन मधे परप्रांतीय कामगारांना भाजीपुरी वाटप !

कौतुक :-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम लॉकडाऊन मधे परप्रांतीय कामगारांना भाजीपुरी वाटप !

उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे यांनी केली परप्रांतीयांची राहण्याची व्यवस्था!

वरोरा प्रतिनिधी :-

संपूर्ण जगात कोरोना व्हायरस मुळे धुमाकूळ घातला असून त्यावर अजूनही कुठलेही औषध निघाले नसल्याने हा आजार पसरू नये यासाठी भारतात २१ दिवसाचे लॉकडाऊन केले असल्याने देशातील कामगारांचे कांमकरीता अनेक जिल्ह्यात व राज्यात झालेले स्थलांतर यामुळे त्यांची मोठी फजिती झालेली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर कामगार हे आता स्वतःच्या राज्यात जाण्यासाठी तडफडत आहे पण वाहतुकीचे साधन नसल्याने तयां पायदळ जाण्याची वेळ आली आहे. अशीच एक घटना वरोरा येथे घडली असून वणी येथे कामानिमित्त आलेल्या मध्यप्रदेशातील कामगार कोरोना संसर्ग पाश्र्वभूमीवर राज्याच्या सीमा बंद झाल्यामुले अडकले असून त्यांना त्यांच्या राज्यात जाण्याचे मार्ग बंद झाले.त्यांना काम नाही पया॔याने खाण्यासाठी अन्न नाही .काय करावे काय नाही अशा मनस्थितीत असतांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा वरोरा तफै 28 मार्चला मदतीचा हात पुढे करून त्यांना भाजी पुरी व थंड पाणी वाटप करण्यात आले. सदर स्तुत्य उपक्रम राबवून संघाने परप्रांतीय मजूरांचे मनोबल वाढविले आहे.व हा उपक्रम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा वरोराचे अध्यक्ष प्रा.वसंत माणुसमारे व सचिव प्रवीण गंधारे व इतर पदाधिकारी यांनी भिकारी,आणि आर्थिक विवंचनेमुळे ज्यांच्या घरी चुली पेटत नाही तसेच परप्रांतातून आलेल्या कामगारांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे.या उपक्रमात भाजी पुरी वाटप करण्याच ठरविले असून आतपर्यंत 165 लोकांना भाजी पुरी व थंड पाणी वाटप करण्यात आले. सुरवातीला वरोऱ्यात असणारे छत्तीसगडी 100 कामगार व वरोऱ्यातील महाकाली नगरीत काम करणारे मध्यप्रदेशातील 20 कामगार,त्यानंतर मध्यप्रदेशातील शिवणी जिल्ह्यातील 15 कामगार यांना यात लाभान्वित करण्यात आले आहे.सदर कामगार हे वणी येथे एका ठेकेदारकडे कामावर होते परंतु लाकडाऊनमुळे काम बंद झाल्याने ते उपासमारीच्या वाटेवर होते. हे कामगार मध्यप्रदेशात जाण्यासाठी वणीवरून 25 की.मी.अंतर पायी चालून वरोऱ्याला वणी नाक्यावर पोहचले. ही बाब पत्रकार संघाच्या लक्षात आली ते चालून,चालून थकले होते भुकेले होते.त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांनी त्यांना घाबरू नका अशी हिम्मत देऊन भाजी पुरी वाटप केले आहे. सदर परप्रांतीय कामगार पायदळ मध्यप्रदेश या आपल्या राज्याकडे निघाले आहे असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे यांच्या लक्षात आणून दिली.आणि त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या उपक्रमाची दखल घेत या कामगारांची 15 एप्रिल पर्यंत त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून दिली. पत्रकार संघांनी शहरात फेरफटका मारून रस्त्यावर असणारे भिकारी यांना सुद्धा भाजीपुरी व पिण्यास थंड पाणी दिले.

या कार्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वरोरा शाखा अध्यक्ष प्रा.वसंत माणुसमारे,कार्याध्यक्ष बाळू भोयर,सचिव प्रवीण गंधारे कोषाध्यक्ष शाहिद अख्तर ,प्रसिद्धी प्रमुख प्रदीप कोहपरे,सदस्य मनीष भुसारी, राजेंद्र मर्दाने ,सादिक थैम,आलेख रठ्ठे आदींनी हातभार लावला.

या स्तुत्य उपक्रमाचे पुवं विदर्भ अध्यक्ष प़ा.महेश पानसे, विदर्भ सरचिटणीस शरद नागदेवे, विदर्भ उपाध्यक्ष प़दिप
रामटेके, जिल्हा अ्ध्यक्ष सुनिल बोकडे , कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया, जिल्हा सरचिटणीस राजू कुकडे यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा