You are here
Home > राष्ट्रीय > अमेरिकेच्या धर्तीवर भारतीयांना मोदी सरकार आर्थिक मदत करणार कां ?

अमेरिकेच्या धर्तीवर भारतीयांना मोदी सरकार आर्थिक मदत करणार कां ?

बरबाद झालेला रोजगार आणि घरी बसलेल्या लोकांची आर्थिक परिस्थिती दयनीय, त्यांना मदत न मिळाल्यास सर्वत्र होणार हाहाःकार!

कोरोना वार्ता :-

कोरोना व्हायरसचा फटका आणि त्यातून उद्भवलेली आर्थिक मंदी यामुळे अमेरिकन सरकारने देशवासीयांना 74 हजार रुपये मदत म्हणून जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसचा फटका आणि आर्थिक मंदी यातून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना रोख रक्कम तर प्रौढ व्यक्तींना 1 हजार अमेरिकन डॉलर (भारतीय चलनानुसार ७४ हजार) देण्यात येणार आहेत. यासाठी १ लाख डॉलर खर्च करण्यात येणार आहे.
आता भारतात नरेन्द्र मोदी सरकारने १५ हजार कोटीचे पैकेज जरी जाहीर केले तरी ती रक्कम फार तोकडी असून जर खरोखरच भारतीयांना आर्थिक मंदीतून बाहेर काढायचे असेल तर प्रत्त्येक कुटुंबीयांना किमान या लॉकडाऊनच्या काळात २५ हजार रुपये द्यायला हवे.आणि जर भारतीय शेतकरी.शेतमजूर. कामगार आणि छोटे व्यापारी यांना मदत मिळाली नाही तर इथे मोठा हाहाकार होईल अशी परिस्थिती आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा