You are here
Home > राष्ट्रीय > चिंताजनक :- भारतात कोरोना व्हायरसचाआकडा ९७९ तर महाराष्ट्रात १८६ वर पोहचला !

चिंताजनक :- भारतात कोरोना व्हायरसचाआकडा ९७९ तर महाराष्ट्रात १८६ वर पोहचला !

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला सतर्कतेचा ईशारा ! 

कोरोना वार्ता :-

कोरोनाचा प्रकोप जागतिक स्तरावर वाढत असतांनाच आता भारतात आणि त्यातच महाराष्ट्रात तो धीम्या गतीने वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे. भारतात येत्या १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेवून स्वतःला जपले तर येणाऱ्या १४ एप्रिल नंतर लॉक डाऊन पासून जनतेची मुक्तता होऊ शकते मात्र जर कोरोना पीडितांचा आकडा जर पुन्हा वाढला तर पुन्हा १४ दिवसाचा लॉकडाऊन वाढू शकतो. आजची कोरोना पीडितांची संख्या ही भारतात ९७९ वर पोहचली तर ‘ महाराष्ट्रात ती १८६ वर पोहचल्याने चिंता वाढली आहे. मात्र आतपर्यंत एकून ८७ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने काही अंशी सुखद वार्ता आहे. तरीही भारतात आतापर्यंत २५ लोकांचा कोरोनामुळे म्रुत्यु झाल्याने जनतेला सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे मत संयुक्त आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा