You are here
Home > राष्ट्रीय > कोरोना अपडेट :-भिडे गुरुजीचा पुन्हा एक जावईशोध? म्हणे गोमूत्र पिल्याने कोरोना जाईल ?

कोरोना अपडेट :-भिडे गुरुजीचा पुन्हा एक जावईशोध? म्हणे गोमूत्र पिल्याने कोरोना जाईल ?

भिडे गुरुजींच्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुले होतात या शोधानंतर कोरोनावर भिडे गुरुजींचा गोमूत्र  उपाय ?

कोरोना वार्ता :-

भारतात कोरोनाचा आकडा वाढला असून जनतेत चिंता व्यक्त केली जात असतांना व सगळे देव धर्म आपआपल्या बिळात लपलेले असतांना भिडे गुरुजी सायन्स सोडून अध्यात्मात घुसले आहे आणि तेच गाय, शेण, व गोमूत्र यामधे अडकून गोमूत्र व गाईचे तूप हे तीव्र जंतूनाशक असून ते पिल्यास कोरोना होणार नाही असा जावईशोध लावला आहे. व सरकारने संचारबंदी हटवावी अशी मागणी केली आहे. या अगोदर आपल्या बागेतील आंबा खाल्ला तर मुले होतात असे अकलेचे तारे ह्याच भिडे गुरुजी यांनी तोडले होते आणि आता कोरोनाच्या व्हायरस वर गोमूत्र आणि गाईचे तूप जालीम उपाय असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
ते पुढे म्हणाले की कोरोना बाधितांच्या खाण्यापिण्यात गोमूत्र, गायीच्या तुपाचा उपयोग केला जावा. त्यानं नक्कीच फरक पडेल. कोणतेही जंतू श्वासावाटे आपल्या शरीरात जात असल्याचं मी आयुर्वेदिक वाचलंय. या जंतूंचा नाश करण्याचं सामर्थ्य गायीच्या तुपामध्ये आहे. बाकी कशातही इतकी शक्ती नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या नाकाला दर ३ ते ४ तासांनी तुपाचं बोट लावावं. सकाळ संध्याकाळ त्यांना गोमूत्र प्यायला द्यावं, असे उपाय त्यांनी सुचवले.
केंद्र आणि राज्य सरकार भगवंतानं दिलेल्या उपायांचा वापर आग्रहपूर्वक करत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर केला गेल्यास कोरोना हा भारतातून हद्दपार होईल असेही अकलेचे तारे त्यांनी तोडले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा