You are here
Home > वरोरा > वरोरा नगरपरिषदचे बांधकाम सभापती छोटूभाई शेख यांनी गरजुना वाटले भाजीपाला व धान्य !

वरोरा नगरपरिषदचे बांधकाम सभापती छोटूभाई शेख यांनी गरजुना वाटले भाजीपाला व धान्य !

वरोरा येथील गरीब परिवाराला छोटूभाई यांच्याकडून मदतीचा हात,! शेकडो कुटुंब लाभान्वित ! 

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहरात आणि तालुक्यातच नव्हे तर आपल्या सामाजिक कार्यातुन अख्ख्या जिल्ह्यात कामगार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे वरोरा नगरपरिषदचे बांधकाम सभापती तथा काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष छोटूभाई शेख यांनी गरजू गरीब परिवाराला कोरोनाच्या या लॉकडाऊन परिस्थितीत मदतीचा हात देवून शेकडो नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वितरण केले आहे.

छोटूभाई शेख व त्यांचे सहकारी यांनी वरोरा येथील प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत येत असलेले. शहीद वीर बाबुराव शेडमाके वार्ड येथील शेकडो नागरिकांना त्यांच्या घरी भाजीपाल्याचे वितरण केले व दुपारी चार नंतर प्रभागातील दोनही शासकीय स्वस्त धान्य दुकान इथे सर्व नागरिकांचे पैसे स्वताच्या खिशातून भरून जवळपास चारशे कुटुंबातील नागरिकांना अन्नधान्य व भाजीपाल्याचे  वाटप छोटू भाई यांनी केले. काही दिवसांपूर्वीच स्वखर्चातून प्रभाग क्रमांक चार आणि पाच येथे फॉगिंग मशीन दारा औषधीचे धुर मारले व पंप द्वारे औषधीची फवारणी केली होती, या वाटप कार्यक्रमाला त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी उपस्थित राहून ट्रॉली रिक्षावर भाजीपाला प्रभागात नेऊन घरोघरी वितरित केले यावेळी छोटू भाई म्हणाले की अशा बिकट परिस्थितीमध्ये सर्व राजकीय व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मतभेद विसरून गोरगरीब नागरिकांना अन्य धान्य व आर्थिक मदत करून सहकार्य करावे व त्यांना धीर द्यावा तसे आव्हान त्यांनी केले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा