You are here
Home > वरोरा > एस आर के कंपनीच्या मजुराचा प्रश्न ऐरणीवर, 6 ते 7 महिन्यापासून पगार नाही,

एस आर के कंपनीच्या मजुराचा प्रश्न ऐरणीवर, 6 ते 7 महिन्यापासून पगार नाही,

मजुराच्या कुटुंबा वर उपासमारीची वेळ, ठानेदार बोरकुटे यांच्या प्रयतनातून तात्काळ पगार करणार, 

प्रतिनिधि — मनोज गाठले

वरोरा – चिमूर नॅशनल हाइवे रोड चे काम एस आर के कंट्रक्शन कंपनी कड़े असून हे काम गेल्या कित्तेक दिवसापासून बंद अवस्तेत आहे,  शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 तारखेपासून लॉकडाउन असल्याने हे काम बंदच आहे, परंतु याचा फटका मात्र येथील अनेक मजूरावर पडला असून गेल्या 6 महिन्यापासून यांचा पगार झाला नसल्याने यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे, आता त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची  वेळ  आल्याने यांचा पोटाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ..
तेव्हा कंपनीच्या सर्व मजुरांनी येथिल ठानेदार  सुधीर बोरकुटे यांच्या कड़े आपल्या मागण्या मांडल्या तेव्हा ठानेदार यांनी एस आर के कंट्रक्शन कंपनी चे मुख्य अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष फोन वर बोलने करून मजुरांना तात्काळ मदत म्हणून प्रत्तेकी 5 हजार रुपये व लॉक डाउन संपल्यावर मजुरांचे पगार देण्यात येईल असे सांगण्यात आले,
तर गेल्या कित्तेक दिवसा पासून हे काम बंद असल्याने या मार्गावर ठीक ठिकाणी रस्त्याचे खोद काम करुण मातीचे व मुरमाचे ढिगारे आहेत त्यामुळे या मार्गावर प्रवास करने म्हणजेच अपघाताला आमंत्रण देऊन जिव मुठित धरून प्रवास करावा लगत आहे, शिवाय या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अनेक नागरिक सुद्धा यमदसनी गेले परंतु स्थानिक तहसीलदार , जिल्हाधिकारी , जिल्हा पालकमंत्री , तसेच लोकप्रतिनिधि आमदार , खासदारांचे  सुद्धा या गंभीर समस्से कड़े जाणीव पूर्वक दुर्लक्ष असून या कंपनी कडून लाखो रुपयांची मागणी करुण आपल्या तिजोरीत भरून गप्प असल्याचे नागरिक चर्चा करीत  आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करुण सदर एस आर के कंट्रक्शन कम्पनिवर गुन्हा नोंद करुण ह्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे ..

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा