You are here
Home > भद्रावती > भद्रावती येथे कोरोना संचारबंदीत अडकलेल्या मजुरांना भोजनदान !

भद्रावती येथे कोरोना संचारबंदीत अडकलेल्या मजुरांना भोजनदान !

भद्रावती विजासन बुद्ध लेणी येथे भोजनाची व्यवस्था !

भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख :

कोरोनाच्या प्रकोपामुळे 25 मार्च 20 पासून संपूर्ण देशात लॉक डाऊन सुरू आहे. यामुळे अनेक लोक बाधित झालेले आहेत. कोरोना ने बाधित अजाऱ्यांच्या व्यवस्थेत डॉक्टर , नर्स व दवाखाने कार्यरत आहेत.
तर लॉक डाऊन मुळे मजूर, रोजंदारी कामगार , पर प्रांतातील मजूर हे संकटात सापडले आहेत.
असेच मध्य प्रदेशातील 40 लोक भद्रावती च्या शासकीय आदिवासी वसतिगृहात तात्पुरत्या तयार केलेल्या ” कोरोना रैन बसेरा ” येथे निवासास आहेत. तसेच जुना बस स्टॉप येथे 10 लोक आहेत.
या आपादग्रस्ता करिता ऐतिहासिक विजासन बुध्द लेणी वर्षावास आयोजन समिती भद्रावती द्वारा दिनांक 4 एप्रिल पासून पाच दिवसाच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यात सहकार्य करणाऱ्या दान दात्यांचे समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
याकरिता समितीचे मार्गदर्शक सिद्धार्थ सुमन, विनयबोधी डोंगरे, अध्यक्षा लीनता जूनघरे , सचिव संजय खोब्रागडे, कोषाध्यक्ष जयदेव खाडे, उपाध्यक्ष नंदा रामटेके, छाया कांबळे, शालिनी गोरघाटे , सहसचिव बी. डी. देशपांडे, प्रियवांद वाघमारे, वैजनाथ कांबळे, तपासनीस, निलेश पाटील, कवडू कांबळे, निलेश पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा