You are here
Home > राष्ट्रीय > ब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाची बत्ती ऊर्जामंत्री नितीन राऊत ने केली गुल ? आता पूर्ण लाईट होनार नाही बंद !

ब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाची बत्ती ऊर्जामंत्री नितीन राऊत ने केली गुल ? आता पूर्ण लाईट होनार नाही बंद !

मोदींच्या इव्हेन्टला महाराष्ट्र सरकारचा खो, इलेक्ट्रिक एक्सपर्टच्या संभावित धोक्याच्या सूचनेवरून दिल्लीत गोंधळ ?

कोरोना अपडेट :-

एकीकडे देशावर कोरोनाचे संकट असतांना पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे आपल्या भाजप पक्षाच्या दिनांक 5 एप्रिलला 9 वाजून 9 मिनिटांनी 40 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशातील जनतेला मूर्ख बनवून पथदिवे, घरातील दिवे बंद करून मेणबत्ती लावा, मोबाईलचा टॉर्च लावा किंव्हा बैटरी लावण्याचा इव्हेन्ट करीत असतांनाच आता देशातील अनेक राज्य सरकारने याविषयी इलेक्ट्रिक एक्सपर्टचा सल्ला घेतल्यानंतर पूर्णपणे इलेक्ट्रिक लाईट बंद करू शकणार नसल्याचे तांत्रिकदृष्ट्या सांगितल्याने पंतप्रधान कार्यालयाची झोप उडाली आहे.यामधे
महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डाँ. नितीन राऊत जे उच्चशिक्षित व अभ्यासू आहे त्यांनी मोदींच्या आव्हानाला खो देत तांत्रिकदृष्ट्या आपण कां संपूर्ण लाईट बंद करू शकत नाही याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

खरं तर भाजपची चाल काय आहे हे आपण समजून घेतली पाहिजे कारण 22 मार्च 1980 ला सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी संघाच्या सरसंघचालक यांनी जनसंघाचे विलीनीकरण भारतीय जनता पक्षात करण्याची मंजुरी दिली व या भाजप पक्षाची दिनांक 6 एप्रिल 1980 ला 9 वाजून 9 मिनिटांनी अधिकृत घोषणा करण्यात आली. त्या भाजपला 5 एप्रिलला 9 वाजून 9 मिनिटांनी पूर्ण 40 वर्ष होतं आहे, त्यामुळे 22 मार्च ला आपण थाळी बजावली , आता 5 एप्रिलला दिवा लावून भाजपच्या 40 वर्ष पूर्ण झाल्याचा जल्लोष भारतीय जनतेनी करावा व भाजप सोबत आम्ही आहो ही एकता संपूर्ण जगाला दाखवावी हा त्यामागील उद्देश होता.

तसं बघता जेवढे राज्य आहे तेवढ्या राज्यातील कुण्या ऊर्जा मंत्र्यांनी यांवर आक्षेप घेतला नाही मात्र उच्चशिक्षित डॉ. नितीन राऊत हे ऊर्जा मंत्री समोर आले आणि संधी घेतली. विषय होता. ५ एप्रिल , रात्री ९ वाजताचा. तेव्हा ९ मिनिटांसाठी घरातील विजेचे दिवे बंद करा . हे आवाहन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केले. मात्र या एका तांत्रिक चुकीने पाँवरग्रीड फेल होईल. वीज निर्मिती केंद्रांमध्ये बिघाड होईल. वीज पुरवठा ठप्प होईल. कोणी लिफ्टमध्ये अडेल. कोणाचा व्हन्टिलेटर बंद पडेल. अनहोनी घडेल. त्यास जबाबदार कोण राहिल? अशी विचारणा त्यांनी मोदींच्या कार्यालयाला केली. मात्र प्रश्न मुद्द्याचा होता.अनेकांच्या प्राणाचा होता. राष्ट्रीय हानीचा होता. त्यामुळे नागपूरवरून सुटलेला हा नितीनचा उध्दव बाण अचूक लागला. त्याने पीएम कार्यालयाचा वेध घेतला होता. या बाणाने दिल्ली घामाघुम झाली. पंतप्रधान कार्यालय चक्रावले. गरगर फिरू लागले. किती वेळ फिरत राहिले. ही चर्चा वेगळीच. लगेच फोनाफोनी सुरू झाली. पाँवरग्रीड अधिकाऱ्यांची मोबाईल काँन्फ्ररन्स बोलावली. कमी-उच्चदाबाने वीज प्रवाह खंडित होणार काय? पलिकडून उत्त्तर आले होय. धोका होवू शकतो. सारेच उडाले. मात्र त्यातून मार्ग काढावे लागेल. आम्ही बघून घेवू. अडथळे टाळू. सहकार्य लागेल. काही वीज केंद्रांचे वीज उत्पादन बंद करावे लागेल. थोडी राष्ट्रीय हानी होईल. यातून मोठे संकट टळेल. निर्णय कडू व कटू आहे. पण आता इलाज नाही. आता माघार नाही. काही पथ्थे पाळावीच लागतील. हे एेकल्यावर सर्वांचा जीव भाड्यात पडला. लगेच ही पथ्थे पाळा. यादी तयार झाली. सर्व राज्यांना गेली. मोदींचा निर्णय अर्ध्यावरच थांबला त्यामध्ये सांगितले केवळ घरातीलच दिवे बंद करा. पथदिवे, ए.सी., टीव्ही, फ्रिज व अन्य उपकरणे बंद करू नका. हे आता वारंवार सांगण्यात येते.

दिल्ली सरकारचा रक्तदाब वाढला आहे. इंव्हेट संपेपर्यंत कायम राहील. आता प्रतीक्षा आहे. आज रात्री ९ वाजून १० मिनिटं केव्हा वाजतात. या घड्याळाच्या काट्याकडे . तो पर्यंत धाकधुक कायम आहे. या घटनेने दिल्लीला मोठा धक्का दिला. इतिहासात पहिल्यादा असे घडले असावे. महाराष्ट्राने नेहमीच दिल्लीत आपला आवाज बुलंद केला आहे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सुद्धा ताठर भूमिका घेवून मोदींच्या इव्हेन्टला जोर कां झटका धीरे से असाच दिला, कारण पंतप्रधानांनी अगोदर सर्वसामान्य माणसाचा ,त्याच्या अडचणीचा , राष्ट्रीय संपत्तीच्या हानीचा विचार करावा मगच पुढचे पाऊल टाका असा संदेश जणू महाराष्ट्राने दिल्लीला दिला,

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा