You are here
Home > चंद्रपूर > भाजपच्या ब्रिजभूषण पाझारे व राहुल पावडे यांनी केली नियमाची पायमल्ली, मदतीच्या नावावर प्रशीद्धी स्टंट ?

भाजपच्या ब्रिजभूषण पाझारे व राहुल पावडे यांनी केली नियमाची पायमल्ली, मदतीच्या नावावर प्रशीद्धी स्टंट ?

पोलिस विभागाने सोशीयल डिस्टेंट ह्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज ! 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोरोनाच्या महाभयानक आलेल्या स्थितीमुळे सर्वसामान्य गोरगरिबांना दोन वेळेचे अन्न सुद्धा मिळणे दुर्भर झाल्याने एकीकडे सरकारची प्रत्यक्षात मदत पोहचली नसतांना सामाजिक संस्था आणि काही राजकिय मंडळी अशा गरीब कुटुंबीयांना अन्नधान्याची मदत व जेवन पोहचवीण्याचे कार्य अगदी निष्ठेने करीत आहे. मात्र दुसरीकडे याच स्थितीचा फायदा घेवून राजकारणातील सत्ताधारी मंडळी आपण जनतेला खूप मोठ्या प्रमाणात मदत करतोय असा देखावा करीत आहे. त्यात जिल्हापरिषदचे सभापती ब्रिजभूषण पाझारे व चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे यांनी आपण एक जबाबदार पदाधिकारी आहो आणि आपल्याला शासनाचे आणि वैद्यकीय नियमांचे पालन करायचे आहे हे ते जणू विसरले वाटतेय आणि म्हणूनच कोरोना व्हायरस पसरू नये यासाठी सोशीयल डिस्टेंट पाळण्याच्या नियमांची त्यांनी पायमल्ली केली असल्याने त्यांचेवर पोलिस विभागाकडून कारवाई कां करण्यात येत नाही ? हा प्रश्न चर्चील्या जात आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा