You are here
Home > वरोरा > खबरदार कुणी चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तू विकाल तर ? छोटूभाई यांचा दुकानदारांना ईशारा !

खबरदार कुणी चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तू विकाल तर ? छोटूभाई यांचा दुकानदारांना ईशारा !

सानीटायझर , मास्क आणि किराणा सामान चढ्या भावाने विकणाऱ्यांची नावे सांगा कारवाई करू, ग्राहक सरक्षण परिषद सदस्य छोटूभाई शेख यांचे ग्राहकांना आव्हान !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या लोकडाऊनच्या काळात वस्तू उपलब्ध नसल्याचा बहाना करून किराणा दुकानदार व मास्क सानीटायझर विकणारे मेडिकल स्टोअर चे मालक हे ग्राहकांची एक प्रकारे आर्थिक लूट करीत आहे. अगोदरच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने संपूर्ण देशात संचारबंदी लावल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. कामधंदे नसल्याने पैशाची चणचण होतं आहे. आणि घरातच राहावे लागत असल्याने एक प्रकारे नागरिक अस्वस्त आहे त्यातच जर किराणा आणि मेडिकल जर चढ्या भावाने दुकानदार ग्राहकांना देत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि शासानने निर्देश दिले आहे की जरा कुणी एमआरपी पेक्षा जास्त किंमतीत एखादी वस्तू विकत असेल तर त्यांच्यावर पोलिस स्टेशन मधे गुन्हे दाखल करण्यात येईल. त्यामुळे सर्व ग्राहकांनी लक्षात ठेवावे की जो कुणी दुकानदार किंव्हा मेडिकल स्टोअरवाल्यांनी चढ्या भावाने वस्तू विकल्या तर माझ्याशी संपर्क करा ( मो.9422194112) आपण निश्चित अशा दुकानदार आणि मेडिकल स्टोअर संचालकांवर कारवाई करू असे आव्हान ग्राहक सरक्षण परिषदेचे जिल्हा सदस्य छोटूभाई शेख यांनी केले आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा