You are here
Home > चंद्रपूर > आनंदाची बातमी :-चंद्रपूर जिल्ह्यात दोन डॉक्टरांच्या जबरदस्त सुरक्षा इलाजाने कोरोना ला नो एन्ट्री ?

आनंदाची बातमी :-चंद्रपूर जिल्ह्यात दोन डॉक्टरांच्या जबरदस्त सुरक्षा इलाजाने कोरोना ला नो एन्ट्री ?

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व पोलिस अधीक्षक डॉ. मोहेश्वर रेड्डी यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोरोना पासून जनतेची सुरक्षा, या दोन्ही डॉक्टरांना जनतेचा सलाम !

लक्षवेधी :-

आज अख्ख्या जगाला कोरोना व्हायरस ने जखडल असून अख्खे जग कोरोनाच्या या महामारीने पूर्णतः भयभीत झालं आहे. भारतात कोरोना व्हायरसचा प्रभाव इतर देशाच्या तुलनेत कमी असला तरी भारतात तिसऱ्या टप्प्यात जर हा कोरोना पसरला तर इतर देशाच्या तुलनेत भारतात बळींची संख्या ही दुप्पट होईल, कारण आपल्याकडे ना पुरेशा टेस्टिंग किट आहे आणि ना व्हैण्टिलेटर आहे, एवढेच काय आपल्याकडे सूसज्य अश्या प्रयोगशाळा सुद्धा नाही की आपण अवघ्या पाच तासात कोरोना टेस्ट परफेक्ट करू, जिथे जगातल्या वैद्यकीय व्यवस्थापनेत इटली हा देश दुसऱ्या क्रमांकाचा आहे त्या इटलीमधे कोरोना व्हायरसने पूर्ण शासकीय यंत्रणा एवढी कुचकामी केली की म्रूतकांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे तिथे जर भारत देश असता तर भारतात मोठी महामारी झाली असती जी नियंत्रणेत आणणे कठीण झाले असते. मात्र सुदैवाने भारताच्या पंतप्रधान मोदींना उशिरा कां होईना जाग आली आणि काही अंशी भारतात कोरोनाला आटोक्यात ठेवता आलं तरीही दिवसेंदिवस म्रूतकाचा आकडा वाढतच असल्याने प्रशासन व्यवस्था कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता दिवसरात्र परिश्रम करीत आहे.
एकीकडे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह चे रुग्ण आढळले त्यामधून चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा, भंडारा या जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.पण त्यामधे चंद्रपूर जिल्हा हा औद्दौगिक जिल्हा म्हणून परिचित आहे, त्यामुळे या जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण असण्याची शक्यता जास्त होती. मात्र जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कुणाल खेमनार हे स्वतः डॉक्टर आहे तर जिल्हा पोलिस अधिक्षक मोहेश्वर रेड्डी हे सुद्धा एक डॉक्टर आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना च्या पार्श्वभूमीवर दोन्ही डॉक्टरांनी आपले प्रखर वैद्यकीय कौशल्य दाखवून एवढी जिल्ह्यात कोरोना विरोधात तटस्त तटबंदी केली की आता खुद्द कोरोना व्हायरसला जिल्ह्याच्या सीमेबाहेरूनच परत जावे लागले.कारण कोरोनाला जिल्ह्यात जणू नो एन्ट्रीचा बोर्ड दिसत होता. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कुणाल खेमनार व जिल्हा पोलिस अधिक्षक मोहेश्वर रेड्डी यांच्या शिक्षणाच्या कहाण्या मोठ्या रंजक आहे. हे दोघे UPSC च्या बैचचे एकाच वेळी बैचमेंट होते.त्याआधी मुंबईच्या प्रतिष्ठित KEM मधून कुणाल खेमनार यांनी MBBS केले तर मोहेश्वर रेड्डी यांनी आंध्र प्रदेशातील कुर्नुल मधून MBBS केले. विशेष म्हणजे UPSC मधे दोघेही सोबत पास झाले होते. मात्र कुणाल खेमनार IAS झाले तर मोहेश्वर रेड्डी हे IPS झाले.असे असले तरी यांचा योग चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा जुळला आणि दोन्ही डॉक्टरांनी कोरोना या शक्तिशाली व्हायरसला जिल्ह्याच्या सीमेवरच रोखले. चंद्रपूर जिल्ह्याला दोन राज्याच्या सिमा आहे त्यापैकी एक तेलंगणा तर दुसरी छतीसगड पण या सिमा मधून कोरोना व्हायरस घेवून येण्याची ताकत दोन्ही डॉक्टरांपुढे नव्हती असे म्हणावे लागेल . कारण कोरोनाशी लढताना सर्व आयुध वापरून लढावे लागले आणि त्या लढाईत सध्यातरी चंद्रपूर जिल्ह्यातील जनता जिंकली आहे. पण त्यामधे सर्वात महत्वाची भूमिका होती ती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार आणि पोलिस अधिक्षक डॉ मोहेश्वर रेड्डी यांची. त्यांच्या कार्याला येथील पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठी साथ देवून कोरोनाच्या लढाईत विजय संपादन केला त्यामुळे त्यांच्या कार्याला या चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेकडून विजयी सलाम !

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा