You are here
Home > चंद्रपूर > ब्रेकिंग न्यूज :-लाकडे आणण्यासाठी गेलेल्या युवकाची जंगलात हत्या ?

ब्रेकिंग न्यूज :-लाकडे आणण्यासाठी गेलेल्या युवकाची जंगलात हत्या ?

लॉक डाऊन च्या काळातील ही सर्वात मोठी जिल्ह्यातील घटना ! 

जिवती प्रतिनिधी :-

तालुक्यातील नारपठार(विजयगुडा)येथिल चार युवक गुरूवारी जंगलात लाकडे आणण्यासाठी गेली होती. त्यापैकी एकाची हत्या झाल्याने सकाळी सर्वत्र खळबळ उडाली. सोमराज उर्फ सोमु इशरू सिडाम(21)असे मृत्यकाचे नाव आहे.
            प्राप्त माहितीनुसार मृत्यक सोमराज व गावातील शंकर आञाम,लिंबाराव कुमरे,व राजु कुमरे हे चार युवक गुरूवारी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान गावापासून अंदाजे चार कि.मि.अंतरावर असलेल्या जंगलात लाकडे आणण्यासाठी बैलबंडी घेऊन गेले होते.जंगलात पोहोचताच चडावर बैलबंडी सोडून लाकडे जमा करण्यासाठी शेताकडे निघाले.अचानक समोरून त्यांच्यावर काही जणांनी सोमराजवर हमला केल्याने सहकारी तिघे जंगलातून गावच्या दिशेने पळाले व घडलेली हकिकत गावकऱ्यांना सांगितली. तेव्हा गावातील काही जण जंगलाकडे धाव घेतली जंगलात शोधाशोध केली माञ सोमराज कुठेच मिळाला नाही.हे चार युवकांनी ज्याच्या शेतात लाकडे तोडली त्या शेतमालकाच्या घरी जाऊन त्यास विचारपुस केली.असता शेतातील राखलेली सागाची झाडे तोडल्याने मी  बैलबंडी घेऊन आलो, तोडलेली झाडे आणा आणि बैलबंडी घेऊन जा असे म्हणल्याने ते वापस निघाले. मात्र वापस येताना गावालगत असलेल्या शेतात सोमराज गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याचे उजेडात दिसताच गावकरी त्या दिशेने पळाले.त्याची विचारपुस केली तेव्हा त्याने मारहाण झाल्याचे सांगितले व त्याने  पहाटे 4 वाजता जीव सोडल्याचे  त्याचे नातेवाईक सांगत आहे.या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.त्यानुसार उपविभागीय पोलिस आधिकारी विलास यामावार व जिवती ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांनी पोलिस कर्मचारी घेऊन घटनास्थळ गाठून पंचनामा केला.आणि मृत्यदेह उत्तरीय तपासणीसाठी गडचांदुरला पाठविला  असुन  अज्ञात मारेकय्रांविरूद्ध जिवती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिवतीचे ठाणेदार विश्वास पुल्लरवार करित आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा