You are here
Home > चंद्रपूर > युवकांचा अनोखा उपक्रम जंगलातून  इंधन आणून सुरू केले गरजूना अन्नदान ..

युवकांचा अनोखा उपक्रम जंगलातून  इंधन आणून सुरू केले गरजूना अन्नदान ..

संभाजी ब्रिगेड च्या वतीने अन्नधान्य केले गोळा, गरजूना घरपोच भोजन सेवा ! 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

संपूर्ण देशात २५ मार्च पासून लॉक डाऊन आहे. तरमहाराष्ट्रात त्यापूर्वी म्हणजे १८ मार्च पासून लॉक डाऊन  सुरू आहे. अशातच  सर्व रोजंदारी करणाऱ्यांचे खूपच हाल होत आहे. इंदिरानगर, श्यामनागर, राजीव गांधी नगर येथे खूप मोठ्याप्रमाणात रोजंदारी करणारे लोक राहतात त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली. शासनाने धान्यसाठा दिला पण चुलीला लागणारे साहित्य आहे. भाजीपाला, किराणा सामान, गॅस हे खरेदिकरिता लागणारे पैसे नसल्यामुळे अनेक लोकांच्या चुली बंद पडल्या होत्या त्यांना जेवणाची मदत व्हावी याउद्देशाने संभाजी ब्रिगेड तर्फे भोजनदान घरोघरी पोहचवुन देण्यात येत आहे. ही व्यवस्था ६ एप्रिल पासून सुरु करण्यात आली. स्थानिक युवकांनी आणि दानशूर व्यक्तींनी किराणा, धान्य, भाजीपाला

इत्यादी वस्तूंचे सहकार्य केले व त्यातून ही भोजन व्यवस्था उभी राहिली ही सतत ६ दिवसापासून भोजनाची व्यवस्था सुरू केली आहे. इंदिरानगर वार्डातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लोकांच्या सहकार्याने ही भोजन व्यवस्था सुरू आहे. खेड्यापाड्यात फिरून येथील युवकांनी चेकनिंबाला, शेणगाव, सोनेगाव, मोरवा या गावातून धान्य गोळा केले आणि ही भोजन व्यवस्था सुरू केली. या  माध्यमातून आतापर्यंत ४००० लोकांना भोजन सेवा देण्यात आली. आणि हे कार्य ३० एप्रिल पर्यंत सुरू ठेण्याचा माणस कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. यासाठी  वार्डातील अनेक महिला, युवक स्वाईच्छेने पुढे येवून सहकार्य करीत आहे. या मध्ये पदाधिकारी विनोद थेरे, दिलीप चौधरी, चंद्रकांत वैद्य, भास्कर भाऊ मुळे, प्रवीण जी खामनकर, प्रदीप सोनुलकर, एकनाथ कापटे, वसंत दुरुटकर, खुशाल दूरुटकर, हेमंत वाटेवर, केतन पाचपुते, परमेशवर दोडके, स्वप्नील क्षीरसागर, पंकज चटप, विलास ताजने, राजू लोणगाडगे, विलास कुमरे, सागर खामनकर, जगदीश मुळे, आशिष तेलंग, गोमदेव थेरे, मनीष पाचपुते, शादिक शेख, प्रदीप वाटेकर, सूरज रासेकर तसेच महिला मध्ये शेरकी काकू, सोनुलकर काकू, नैताम काकू, सौ. पल्लवी थेरे, सौ.वंदना दुरुटकर, सौ. मालाताई खामनकर, सौ. डिंपल लेनगुरे, सौ. साधनाताई मुळे, सौ. नलिनी कापटे तसेच ज्येष्ठ मंडळी दुरुटकर काकाजी, बबन जी क्षिरसागर, सुधाकर पाचपुते, श्रावण जी लोणगाडगे….
तसेच अनेक युवक, महिला आणि दानशूर लोकांचे सहकार्य पैसा, धान्य, वेळ लोक देत आहे. या कृती ची चर्चा वार्ड तसेच शहरात सुरू आहे. हे पुण्य काम आहे अश्याप्रकारची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. लोक गरीब आहेत पण स्वाभिमानी आहेत त्यामुळे त्यांना सहकार्य करणे ही आपली जबाबदरी आहे हा एकमेव उद्देश ठेवून कार्य सुरू आहे..

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा