You are here
Home > वरोरा > छोटूभाई शेख यांच्या संकट काळातील जनपयोगी कार्याने प्रभागातील नागरिक भारावले.

छोटूभाई शेख यांच्या संकट काळातील जनपयोगी कार्याने प्रभागातील नागरिक भारावले.

प्रभागातील सर्व वार्डात तब्बल १२ दिवसात एक वार्ड प्रमाणे फॉगिंग मशीनने धूर व पंपाने स्वतः वार्डात फवारणी केल्याने छोटूभाई यांच्या कार्यपद्धतीची सर्वत्र प्रशंसा.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

वरोरा शहरातील प्रभागा क्र. ४ चे नगरसेवक तथा नगरपरिषदचे बांधकाम सभापती छोटूभाई शेख हे नेहमीच त्यांच्या जनकार्यातुन चर्चेत असतात, त्यांनी लॉक डाऊन च्या या संकट काळात आपल्या प्रभागातील अंतर्गत वार्डात १२”दिवसात १ वार्ड प्रमाणे फॉगिंग मशीन द्वारे आणि २ वेळा पंपाने फवारणी करण्यात आली आहे, यावेळी पूर्ण प्रभागात कर्मचाऱ्यांसोबत पायदळ फिरून प्रभागाचे नगरसेवक तथा सार्वजनिक बांधकाम सभापती छोटूभाई यांनी आपल्या वार्डात.घर.घर जाऊन फवारणी केली व तिसरा राऊंड मागील तीन दिवसापासून. सुरू आहे. त्यांनी यावेळी सर्व नागरिकांच्या.घरोघरी जाऊन विनंती केली की आपण घरी राहून कोरानाला हरविण्याकरिता. शासन-प्रशासनाला सहकार्य करा. काही दिवसापूर्वी प्रभागातील शेकडो गरजू नागरिकांना अन्नधान्य व भाजीपाल्याची मदत छोटूभाई च्या माध्यमातून झाली आहे त्याचबरोबर हा प्रभागाच्या विकासात छोटूभाई यांच्या अत्यंत मेहनतीमुळे व पाठपुराव्यामुळे मोठे योगदान समोर आलेले आहे आणि त्यांना नागरिकांचे मोठे सहकार्य लाभत आहे. छोटूभाई हे नेहमी प्रभागातील नागरिका बरोबर शहरातील नागरिकांच्या सुद्धा समस्या जाणून घेण्याचे काम करीत असून त्यांच्या कामगिरीमुळे प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी त्यांना नेहमी सहकार्य या कामाकरिता राहत आलेले आहे. म्हणून त्यांना या प्रभागातील नागरिकांनी कामाची पावती म्हणून अपक्ष असतांना सुद्धा छोटूभाई यांना निवडून दिले होते आणि त्यांचं उपकारांची परतफेड करण्याकरिता छोटूभाई हे नेहमी वार्ड विकासाच्या कामात असतात असे मत अनेक नागरिकांनी प्रभाग क्रमांक ४ सह शहरातील इतर नागरिकांनी व्यक्त केले आहे

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा