You are here
Home > चंद्रपूर > सनसनाखेज :_लॉक डाऊनच्या काळात मोतीराम आक्केवार घरून बेपत्ता ?

सनसनाखेज :_लॉक डाऊनच्या काळात मोतीराम आक्केवार घरून बेपत्ता ?

दुर्गापूर पोलिस स्टेशन मधे पत्नी मीना आक्केवार यांची तक्रार, अजूनही शोध लागला नसल्याने मीना चे बेहाल ! कुणाला पता लागल्यास मोबाईल वर कळविण्याचे आव्हान

चंद्रपूर प्रतिनिधी :-

देशात लॉक डाऊन झाल्यानंतर अनेक लोकं जिकडे तिकडे जाण्यासाठी सुविधा नसल्याने अडकून असल्याने त्यांच्या नातेवाईकांना मोठी चिंता लागली असतांनाच आता चक्क घरून गेलेल्या मोतीराम आक्केवार वय अंदाजे ४६ वर्ष यांचा पत्ता लागला नसल्याने पत्नी मीना आक्केवार यांनी दुर्गापूर पोलिस स्टेशन मधे दिनांक २३ मार्चला तक्रार दिली, मोतीराम आक्केवार हे अचानक दिनांक ९ मार्चला घरून बाहेर जाण्यासाठी निघाले ते परत आलेच नाही. त्यांचा शोध पत्नी मीना हिने सर्वत्र केला. अनेक नातेवाईकांना फोन करून विचारले. शहरातील पतीच्या पूर्ण मित्राशी संपर्क केला मात्र तरीही शोध लागला नसल्याने त्यांनी दुर्गापूर पोलिस स्टेशन गाठले पण तरीही तपास लागला नाही. आपल्या पतीच्या वियोगाने आज ती तडफडत असून दिवसरात्र देवाचा धावा करीत आहे. या तीच्या आक्रोशाने आजूबाजूच्या परिवाराना सुद्धा कळवळा येत आहे . मोतीराम आक्केवार हे ज्योतीबा नगर तूकूम येथे किराराने राहत होते त्यांना मुले नसून दोघेच पतीपत्नी राहत होते.
ज्यांना कुणाला यांचा शोध लागला किंव्हा कुठे आढळला तर 9923085602 क्रमांकावर किंव्हा दुर्गापूर पोलिस स्टेशन मधे संपर्क करावा अशी विनंती मोतीराम आक्केवार यांच्या पत्नी सौ. मीना मोतीराम आक्केवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा