You are here
Home > चंद्रपूर > धक्कादायक :-सुदर्शन (भोला) चौधरी यांचा रेल्वे कोळसा सायडिंगवर करंट लागून म्रुत्यु !

धक्कादायक :-सुदर्शन (भोला) चौधरी यांचा रेल्वे कोळसा सायडिंगवर करंट लागून म्रुत्यु !

रेल्वे पोलिस चौकशी करणार !

घूग्गूस प्रतिनिधी :-

घुग्गुस येथील वेकोलिच्या कोळसा सायडिंग मधील रेल्वे कोळसा व्ह्यगनचा वरील हाय वोल्टेज विजेचा शॉक लागून सुदर्शन (भोला) चौधरी ह्या एसीसी सिमेंट कंपनीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू!
बँक ऑफ इंडिया मागील परिसरात नवीन वेकोलीची कोळसा सायडिंग असून या सायडिंग वरून रेल्वे वॅगननी कोळसा जातो या रेल्वे व्हगन चढून रोज अनेक व्यक्ती उपजीविका भागविण्यासाठी कोळसा चोरी करतात मात्र आज जे भोला चौधरी सकाळी वेगिंनवर चढून कोळसा काढत असताना हाय वोल्टेज वीज ताराचा त्याला शॉक लागल्यामुळे ते मरण पावले अशी चर्चा होती ती चुकीची असल्याची त्या वार्डातील लोकांची चर्चा आहे, मात्र घरी सर्वकाही असतांना ते रेल्वे सायडिंग वर गेले कसे हा प्रश्न गंभीर असून त्यांचे शरीर पूर्ण भाजल्या गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला हि घटना सकाळी 6.45 वाजता दरम्यान उघडकीस आली. खरा तर या सायडिंगवरून नेहमी कोळसा चोरी होत असताना सुरक्षा रक्षक व वेकोलिचे अधिकारी यांचे दुर्लक्ष का होत आहे असा प्रश्न निर्माण होतो पण भोला चौधरी यांचा म्रुत्यु हा जरी कोळसा व्हगन वरील हाय वोल्टेज तारेला लागून झाला असला तरी या प्रकरणाची चौकशी रेल्वे पोलिस यांनी करून हा घातपात तर नसावा या दिशेने चौकशी व्हावी अशी मागणी होतं आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा