You are here
Home > वरोरा > वरोरा येथील समाजसेविका योगीता लांडगे यांचा कोरोना लॉकडाऊन मधे अनोखा उपक्रम !

वरोरा येथील समाजसेविका योगीता लांडगे यांचा कोरोना लॉकडाऊन मधे अनोखा उपक्रम !

प्रगती बहुउद्देशीय संस्था आणि जिजाऊ सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या माध्यमातून मॉस्क तय्यार करून व बाहेरील प्रांतातील जिल्ह्यातील निर्वासीतांचे समुपदेशन करून राबविला उपक्रम !

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहर तालुकाच नव्हे तर वरोरा भद्रावती या दोन जुळ्या तालुक्यात ग्रामीण जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहचवीने, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून घरगुती भांडणे समुपदेशन करून सोडवणे, पती पत्नीच्या अंतर्गत वादामुळे तुटलेल्या संसाराला जोडणे व सार्वजनिक उपक्रम राबवून स्त्रियाना आत्मनिर्भर करणे इत्यादी समाजपयोगी कार्यात अग्रेसर असणाऱ्या जिजाऊ सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या अध्यक्षा योगीता लांडगे यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झालेल्या लॉक डाऊन मुळे आपला अनोखा उपक्रम राबविला आहे. जनतेला कमी खर्चात मॉस्क मिळावे म्हणून त्यांनी स्वतः त्यांच्या संस्थेतील सहकारी महिलांना रोजगार मिळविण्याच्या द्रुष्टीने मॉस्क बनविण्याचे काम दिले, एवढेच नव्हे तर ते मॉस्क गुणवत्ता असलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याची मागणी सुद्धा आहे. हे मॉस्क महिलांनीच घरोघरी जावून विकले व आणि संदेश दिला की महिलांना भीक नको तर साथ द्या.

वरोरा येथे अनेक वर्ष समाज सेविका म्हणून कार्यरत योगीत लांडगे यांनी आपल्या प्रगती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा येथील कोरोना लॉक डाऊन मुळे अडलेल्या विस्थापितांसाठी तात्पुरत्या निवारा केंद्रात आश्रय दिलेल्या व्यक्तींना नियमितपणे मार्गदर्शन आणि समुपदेशन चालविले आहे, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीतून चालवीलेल्या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होतं आहे. मात्र खंत ही आहे की ज्या संस्थाना सरकार कोट्यावधीचे अनुदान देते त्याच संस्थाना मॉस्क बनविण्याचे कंत्राट देतात पण वर्षभर समाजासाठी झटणाऱ्या योगीता लांडगे यांच्या प्रगती बहुउद्देशीय संस्था, किंव्हा जिजाऊ सुशिक्षित बेरोजगार संस्थेला सरकार तर्फे मॉस्क बनविण्याचे कंत्राट कां दिल्या जात नाही ? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे पण असे असतांना सुद्धा समाजसेवेचे व्रत जोपासण्याऱ्या योगीता लांडगे यांचे निरंतर कार्य जनतेला दिलासा देणारे ठरत आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा