You are here
Home > भद्रावती > महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या निवेदनाची दखल ! बैंकेत वाढवले कैश काऊंटर !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या निवेदनाची दखल ! बैंकेत वाढवले कैश काऊंटर !

संघाच्या तालुका शाखा भद्रावती यांनी तहसिलदार यांना दिले होते निवेदन !

भद्रावती प्रतिनिधी उमेश कांबळे :-

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा पत्रकारितेसोबतच सामाजिक दायित्व निभावून जनतेला असुविधा झाल्यास प्रशासनासोबत दोन हात करण्यासाठी सुद्धा संघ पुढे असतो. भद्रावती शहरात बैंक ऑफ महाराष्ट् मध्ये कोरोना च्या लॉक डाऊन परिस्थितीत बैंक प्रशासनाने केवळ एक कैश काऊंटर ठेवले होते.
या संदर्भात बैंक ग्राहकांच्या तक्रारी संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्यावर त्यांनी बैंक प्रशासनाला विचारपुस केली असता एकच कैंश कॉउंटर असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भद्रावती तहसीलदार यांना निवेदन देवून बैंकेमधे किमान दोन कैश काऊंटर लावावे अशी मागणी केली होती. त्या निवेदनाची दखल घेवून आता २ कैश काऊंटर पुन्हा वाढविण्यात आले असूं आता ३ कैंश कॉउंटर झाले, शिवाय बैक ऑफ इंडीआ मध्ये सुद्धा अगोदर २ होते आणि आता ५ वाढविण्यात आले त्यामुळे आता भद्रावती मधे दोन बैंकेचे एकून ७ कैंश काउंटर झाले आहेत.त्यामुळे ग्राहकांना सुविधा झाली आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा